शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफिया अटकेत

By admin | Updated: July 5, 2014 01:03 IST

औरंगाबाद : औरंगाबाद, अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांतील वाळूपट्ट्यांत प्रचंड दहशत असलेला आणि गेल्या अनेक महिन्यांपासून नगर पोलिसांना ‘वाँटेड’ असलेला कुख्यात वाळूमाफिया शेख युनूस

औरंगाबाद : औरंगाबाद, अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांतील वाळूपट्ट्यांत प्रचंड दहशत असलेला आणि गेल्या अनेक महिन्यांपासून नगर पोलिसांना ‘वाँटेड’ असलेला कुख्यात वाळूमाफिया शेख युनूस शेख चाँद (४३, रा. बीड बायपास परिसर, औरंगाबाद) हा शुक्रवारी अलगद गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागला. तो सापडल्याची माहिती मिळताच नगर पोलिसांचे एक पथक त्याला अटक करण्यासाठी रात्री औरंगाबादकडे निघाले.कारवाईबाबत माहिती देताना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश अघाव यांनी सांगितले की, शेख युनूसविरुद्ध औरंगाबादेतील पैठण, पैठण एमआयडीसी, बिडकीन, बीड जिल्ह्यातील गेवराई, नगर जिल्ह्यातील शेवगाव या पोलीस ठाण्यांमध्ये वाळूतस्करीशी संबंधित अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वाळूपट्ट्यात गोळीबार करणे, दुसऱ्या ठेकेदारांची वाहने जाळणे, दगडफेक करणे, मारहाण करणे, ठार मारण्याच्या धमक्या देणे, सरकारी नोकरांवर हल्ले करणे, अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्या अशा गुन्हेगारी कृत्यांमुळे या तिन्ही जिल्ह्यांतील वाळूपट्ट्यांमध्ये त्याची प्रचंड दहशत आहे.युनूसवर नगरला ‘मोक्का’ युनूसच्या वाळूपट्ट्यातील वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे अहमदनगर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध संघटित गुन्हेगारी कायदा मोक्काअंतर्गत कारवाई सुरू केली होती. त्याला मोक्का लावण्यात आला होता. शिवाय नगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध वाळूतस्करीप्रकरणी एक आणि गोळीबार केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून तो नगर पोलिसांना ‘वाँटेड’ होता, असे पोलीस निरीक्षक अविनाश अघाव यांनी सांगितले.औरंगाबादेत खुलेआम वावर1नगर पोलिसांना गेल्या अनेक महिन्यांपासून ‘वाँटेड’ असलेला शेख युनूस हा औरंगाबादेत बीड बायपास परिसरात वास्तव्यास आहे. तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ताही आहे. तिकडे ‘वाँटेड’ असतानाही औरंगाबादेत गेल्या काही महिन्यांपासून तो खुलेआम वावरत होता. दरम्यान, आज दुपारी सातारा परिसरात मंगळसूत्र चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे, हवालदार शेख आरेफ, नंदू चव्हाण, एजाज हे ‘त्या’ चोरांच्या शोधार्थ गस्तीवर असताना मध्यवर्ती बसस्थानकासमोर एका कारमधून युनूस जात असल्याचे त्यांच्या नजरेस पडले. पोलिसांना पाहून युनूस गांगरला. त्यामुळे पोलिसांनी त्याची कार अडविली. त्याला ताब्यात घेतले व गुन्हे शाखा कार्यालयात आणले. पोलिसांनाचविचारला जाब2युनूसला गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर युनूसने ‘तुम्ही मला का पकडत आहात. माझ्यावर सध्या कोणताही गुन्हा नाही. मला अटक करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. नगरमधील मोक्काच्या प्रकरणात मला जामीन मिळालेला आहे,’ असे म्हणत त्याने पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस निरीक्षक अघाव यांनी शेवगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांशी आणि मग नगरच्या अधीक्षकांशी संपर्क साधला. तेव्हा युनूस शेवगाव पोलिसांना गेल्या अनेक महिन्यांपासून दोन गंभीर गुन्ह्यांत वाँटेड असल्याचे स्पष्ट झाले. तो सापडल्याची माहिती मिळताच नगर पोलिसांचे एक पथक त्याला अटक करण्यासाठी औरंगाबादला निघाल्याचे पोलीस निरीक्षक अघाव यांनी सांगितले.