शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यानंतर बाजारपेठ अनलॉक होण्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 13:22 IST

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे '' ब्रेक द चेन'' सुरू होऊन दोन महिने उलटले.

ठळक मुद्देबाजारपेठ १ जूनपासून अनलॉक करण्याची मागणीजिल्हा व्यापारी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शहरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला तब्बल दोन महिने झाल्यानंतर आता व्यापाऱ्यांना अनलॉकचे वेध लागले असून १ जूनपासून व्यापार सुरु होण्याची अपेक्षा आणि प्रतीक्षा आहे.

दोन महिन्यांपासून लॉकडाऊन असलेली बाजारपेठ १ जूनपासून अनलॉक करण्याची मागणी शहरातील २५ हजार व्यापाऱ्यांच्यावतीने जिल्हा व्यापारी महासंघाने केली आहे. यासंदर्भात व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे '' ब्रेक द चेन'' सुरू होऊन दोन महिने उलटले. यात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून शासनाला सहकार्य केले. या काळात व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.

राज्य सरकारकडून अजूनही व्यापारी वर्गासाठी कोणतेही आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले नाही. मालमत्ता कर, वीज बिल, जीएसटीसह अन्य करात कोणतीही सूट दिली नाही. दुकानातील कामगारांना पगार, दुकान भाडे, स्वतःचा घर खर्च भागवणे, औषधोपचार खर्च, कर्जावरील व्याज, त्यात पावसाळ्यापूर्वीची करायची देखभाल दुरुस्ती असे अनेक कामे प्रलंबित आहेत. आता जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. याचा विचार करून १ जूनपासून सर्व दुकाने उघडण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने द्यावी, असे निवेदनात म्हटले. महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, लक्ष्मीनारायण राठी, जयंत देवळाणकर, असंतोष कावले यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

९ तास दुकाने उघडण्याची परवानगी द्या१ जूनपासून सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी. दररोज ९ तास बाजारपेठ उघडी राहिली तर एकदम गर्दी होणार नाही. कोरोनासंदर्भात दिलेले संपूर्ण नियमाचे व्यापारी पालन करतील, असेही निवेदनात नमूद आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादMarketबाजार