शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वैजापूर न.प.साठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:03 IST

: येथील नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी गुरुवारी रात्री दहा वाजता थांबल्या. गुरुवारी रात्री दहापर्यंत प्रचाराची मुभा असल्याने सर्वच पक्षांच्या प्रमुख उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

वैजापूर : येथील नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी गुरुवारी रात्री दहा वाजता थांबल्या. गुरुवारी रात्री दहापर्यंत प्रचाराची मुभा असल्याने सर्वच पक्षांच्या प्रमुख उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केले.नगर पालिकेच्या ११ प्रभागांतील २३ नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी शुक्रवारी (दि.६) मतदान होत आहे. मतदानाच्या आठ तासांपूर्वी प्रचार बंद करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश असल्याने गुरुवारी रात्री दहा वाजता राजकीय पक्षांचा प्रचार संपुष्टात आला. नगर पालिका निवडणुकीत यंदा भाजप व शिवसेनेच्या वतीने सर्वाधिक उमेदवार उभे केल्याने या दोन्ही पक्षातच मतदानासाठी चढाओढ दिसणार आहे. शिवसेनेने २३ उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. भाजपने १९ तर राष्ट्रवादीने ४ उमेदवार उभे केले. काँग्रेसतर्फे १ उमेदवार पंजा निशानीवर स्वार झालेले आहे. एम.आय.एम. पक्षासह अपक्ष एकूण ५४ उमेदवार नगरसेवक पदासाठी तर नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवार रिंगणात असून त्यांनी गेल्या पंधरा दिवसांत प्रचार केला. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. त्या तुलनेत काँग्रेसकडून मोठ्या नेत्यांची एकही सभा झाली नाही. राष्ट्रवादीकडून आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्याच सभेची आठवण वैजापूरकरांच्या कायम स्मरणात राहणारी ठरली. तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे व खासदार चंद्रकांत खैरे यांनीही प्रत्येक सभेतून भाजपवर तोंडसुख घेतले. गुरुवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही सायंकाळी डेपो रस्त्यावर शिवसेनेची सभा झाली. एम.आय.एम, काँग्रेसच्या सभांना नेतेच आले नाहीत. गेली पंधरा दिवस भोंगे, उमेदवारांच्या प्रचारगीतांनी प्रत्येक वस्तीत प्रचार कल्लोळ दिसून आला. गुरुवारी रात्री या भोंग्यांवर, प्रचारगीतांवर बंधने आली.वाजतगाजत प्रचार थांबलावैजापूर शहरात प्रचार संपण्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात, दुचाकीवरून सर्वपक्षीय नेत्यांनी प्रचारफेऱ्या काढल्या. प्रत्येक गल्लीबोळात दिवसभर कार्यकर्ते मतांचा जोगवा मागत फिरत होते. दुसरीकडे मतदान शांततेत व्हावे, यासाठी प्रशासकीय तयारीला वेग देण्यात आला. उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, तहसीलदार सुमन मोरे, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाºयांनी मतदान प्रक्रियेतील संवेदनशीलतेचा आढावा घेतला. दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी रोख स्वरुपात रकमा पकडण्यात आल्या.

टॅग्स :ElectionनिवडणूकMuncipal Corporationनगर पालिका