बीड: २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मागील पाच वर्षांत जिल्ह्यात तरूण मतदारांची मोठी वाढ झालेली आहे़ जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात पाच वर्षांत १ लाख २३ हजार ८२७ मतदारांची वाढ झाली आहे़ दिवसेंदिवस मतदारांमधील जागरूकता पाहता तरूण मतदारांचा प्रभाव सर्वच मतदार संघावर राहणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीची अजून आचारसंहिताच लागलेली नसताना देखील मतांची चर्चा गावागावात रंगू लागली आहे़ अजून तर बहुतांश पक्षांच्या उमेदवाऱ्या देखील निश्चित झालेल्या नाहीत़ असे असताना देखील जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघामध्ये चर्चेचे उधाण आले आहे़ २००९ च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा निवडणुकांमध्ये एकूण १६ लाख ९३ हजार ९५२ एवढे मतदान होते़ यापैकी ११ लाख ६९ हजार ५०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता़ २००९ ते २०१४ या पाच वर्षाच्या काळात बीड जिल्ह्यात १ लाख २३ हजार ८२७ मतदान वाढले आहे़ वाढलेल्या नव मतदारांची आकडेवारी पहाता़ येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर तरूणांचा प्रभाव राहणार असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे़ (प्रतिनिधी)मागील पाच वर्षाच्या काळात वाढलेले तरूण मतदार लक्षात घेता़ पक्षांनी देखील हायटेक प्रचार यंत्रणा सज्ज केलेली असल्याचे पहावयास मिळत आहे़ विधानसभा निवडणुकीत तरूणांचे मतदान निर्णयक ठरणार आहे़ याची पुरती कल्पना संभाव्य उमेदवारांना असल्याने सर्वच पक्षातील नेत्यांनी ‘नेट’ कऱ्यांची टीम उभी केलेली आहे़
सव्वालाख मतदारांची पाच वर्षांत पडली भर
By admin | Updated: September 12, 2014 00:27 IST