शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

मतविभागणीच ठरली पराभवास कारणीभूत

By admin | Updated: November 16, 2014 00:36 IST

जालना : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी न झाल्याने मतविभागणीचाच फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसला.

जालना : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी न झाल्याने मतविभागणीचाच फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसला. त्यामुळे भोकरदनची जागा गमवावी लागली तर बदनापूरला शर्थीचे प्रयत्न करूनही पराभव स्वीकारावा लागला, असा सूर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीतून उमटला. येथील राष्ट्रवादी भवनमध्ये माजी खासदार अ‍ॅड. अंकुशराव टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, आ. राजेश टोपे, माजी आमदार चंद्रकांत दानवे, बबलू चौधरी, राजेश राऊत, एकबाल पाशा, उपनगराध्यक्ष शाह आलमखान, बाळासाहेब तनपुरे, गोविंदभाऊ राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. अंकुशराव टोपे म्हणाले की, घनसावंगी मतदारसंघात विविध विकास कामे मोठ्या प्रमाणावर झाल्याने विरोधी पक्षांनी फारसा जोर लावण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यांना मतदारांनी नाकारले व राजेशभैय्या यांना निवडून दिले. भोकरदन व बदनापूरमध्ये पक्षाच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर मते मिळविली. आ. टोेपे म्हणाले की, मतविभागणीचा फटका बसल्यामुळेच जिल्ह्यात तीन मतदारसंघांमध्ये पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला. परंतु आता पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करण्याची गरज आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, माजी आ. चंद्रकांत दानवे, बबलू चौधरी, एकबाल पाशा आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. या बैठकीस जयमंगल जाधव, जिजाबाई जाधव, गणेश आर्दड, जयाजी देशमुख, विश्वंभर भुतेकर, मनोज मरकड, अ‍ॅड. संजय काळबांडे, संजय दाड, रमेशचंद्र तवरावाला आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)