शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

‘वर्ल्ड टूर’वर निघालेल्या जेफ बेजोस कुटुंबियांची वेरूळसह वाराणसी, आग्रा येथे भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 07:08 IST

जैन, हिंदू अन् बौद्ध संस्कृती घेतली जाणून

राम शिनगारे / संतोष हिरेमठ  औरंगाबाद : कुटुंबियांसह ‘वर्ल्ड टूर’वर निघालेली जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती जेफरी प्रेस्टन बेजोस ऊर्फ जेफ बेजोस यांनी वेरूळ लेण्यांच्या माध्यमातून जैन, हिंदू अन् बौद्ध संस्कृतीची परंपरा, माहिती जाणून घेतल्याची माहिती पुरातत्व विभागातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. वेरुळातील तीन लेण्यांची पाहणी करण्याचे नियोजन होते, मात्र वेळ शिल्लक राहिल्यामुळे अतिरिक्त दोन लेण्यांचीही त्यांनी पाहणी केली.आॅनलाईन शिपिंगमधील जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ‘अ‍ॅमेझॉन डॉट कॉम’चे संस्थापक आणि जगातील श्रीमंतांपैकी एक असलेल्या जेफ बेजोस यांनी शनिवारी (दि.२३) वेरूळ लेण्यांची पाहणी केली. या दौऱ्याची कल्पना पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनाही नव्हती. अतिशय गोपनीय असलेल्या दौºयात जेफ बेजोस यांच्यासोबत अमेरिकन असलेले दोन सुरक्षारक्षक होते, तर मुंबईहून एक सुरक्षा रक्षक मागविण्यात आला होता. औरंगाबाद विमानतळावरून आलेला त्यांच्या गाड्यांचा ताफा थेट लेणीच्या प्रवेशद्वारावर थांबला होता. टूरचे नियोजन करणाºया खाजगी कंपनीने बेजोस कुटुंबियांतील व्यक्ती आणि सुरक्षा रक्षकांचे तिकीट येण्यापूर्वीच काढून ठेवले होते. मुंबईहून मागविलेल्या आलिशान गाड्यांतून त्यांचे कुटुंबीय खाली उतरताच उभ्या असलेल्या एका बसमध्ये बसले. ती बस थेट जैन संस्कृतीची विविध प्रारूपे असलेल्या ३२ आणि ३३ क्रमांकाच्या लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ थांबली. या दोन्ही लेण्यांची पाहणी केल्यानंतर बस थेट हिंदू संस्कृती दर्शविणाºया १५ (विष्णूच्या अवतारांची रुपे ) आणि १६ (कैलास लेणी) क्रमांकाच्या लेणीची पाहणी केली. ‘आधी कळस, मग पाया’ या प्रकारची रचना असलेल्या कैलास लेणीची त्यांनी सर्वाधिक स्तुती केली; मात्र स्वत:हून काही अधिक माहिती विचारली नाही. तेथून बौद्ध संस्कृती दर्शविणाºया १० क्रमांकाच्या लेणीची पाहणी केली. या लेण्यांच्या पाहणीतून त्यांनी तिन्ही धर्मांची संस्कृती, निर्मिती, वैभवशाली परंपरा जाणून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.घटनांचे बारकाईने निरीक्षणवेरूळ लेण्यांची पाहणी करताना जेफ बेजोस हेच बारकाईने निरीक्षण करीत होते. गाईड सांगत असलेली माहिती ऐकून घेत होते. जेफ बेजोस यांच्या तोंडून आवडलेल्या माहितीवर, कलाकृतीवर ‘ओह अमेझिंग’, ‘आऊटस्टँडिंग’ असे उत्स्फूर्त शब्द निघत होते; मात्र त्यांची पत्नी आणि मुले गाईड देत असलेली माहिती अधूनमधून ऐकत होते. उर्वरित वेळेत त्यांनी छायाचित्र काढण्यालाच प्राधान्य दिले.चार दिवस भारतातवर्ल्ड टूरवर निघालेले जेफ बेजोस यांचे कुटुंबीय चार दिवस भारतातील वास्तूंची पाहणी करणार होते. अमेरिकेतून थेट नागपूर येथील विमानतळावर आलेले कुटुंबीय हे औरंगाबादला शनिवारी (दि.२३) पोहोचले. तेथून वाराणसी, नंतर आग्रा येथील ताजमहालाची पाहणी करणार होते. याप्रमाणे त्यांचा भारतात तीन रात्री मुक्काम आणि चार दिवसांचा प्रवास असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.अमेरिकन कंपनीने निवडला गाईडजेफ बेजोस कुटुंबियांना वेरूळ लेण्यांची माहिती देण्यासाठी टूरचे नियोजन करणाºया ‘ए अ‍ॅण्ड के’ या अमेरिकन कंपनीने गाईडची निवड केली होती. गाईड अलीम कादरी यांना याविषयी विचारले असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला; मात्र त्यांच्याविषयी सोशल साईटस्वरून माहिती घेतली असता, अमेरिकेतून येणाºया ‘व्हीव्हीआयपी’ व्यक्तींना माहिती देण्यासाठी त्यांनाच प्राधान्य देण्यात येत असल्याचे समजले. यापूर्वीही त्यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक, चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यांसह इतरांना वेरूळ-अजिंठा लेण्यांचे दर्शन घडविले आहे.शाकाहारी जेवणाला दिले प्राधान्यजेफ बेजोस कुटुंबियांनी औरंगाबादच्या दौºयात शाकाहारी जेवणास प्राधान्य दिले. शहरातील एका नामांकित हॉटेलमधून त्यांच्यासाठी खास जेवण मागविले होते. बेजोस हे कोणते खाद्यपदार्थ घेतील, याची उत्सुकता होती. बेजोस यांनी शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतला. गोपनीयतेमुळे जेवणातील मेनू सांगता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.औरंगाबाद ते वेरूळ लेणी प्रवासात त्यांनी सोबत सँडविच घेतले होते, तसेच प्रवासादरम्यान त्यांनी त्यांच्या खाजगी विमानातील पाण्याच्या बॉटल सोबत घेतल्या होत्या.