शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

खुलताबादेत रास्ता रोको आंदोलनास हिंसक वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:52 IST

‘पाणी’ पेटले : दगडफेकीत बस, पोलीस व्हॅनच्या काचा फुटल्या, आठ जणांना अटक; १०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

खुलताबाद : खुलताबाद शहराला पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी शनिवारी खुलताबाद येथील सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या रास्ता रोको आंदोलनास हिंसक वळण लागले. पोलीस व आंदोलकांमध्ये झालेल्या तू-तू, मै- मै मध्येच काही आंदोलकांनी दगडफेक करुन एस.टी. बस व पोलीस व्हॅनच्या काचा फोडल्या. या प्रकरणी पोलिसांनी १५ जणांविरूध्द गुन्हा दाखल करुन आठ जणांना अटक केली. याशिवाय जमावातील जवळपास १०० जणांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हे दाखल केल्याने खुलताबादेत खळबळ उडाली.खुलताबाद शहराचा पाणीप्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून पेटला असून गिरिजा मध्यम प्रकल्प व इतर प्रकल्प कोरडाठाक पडल्याने जवळपास कुठेच पाण्याचे स्रोत नसल्याने शासनाने मंजूर केलेले सात टँकरही पाणीपुरवठा करण्यास अपयशी ठरल्याने जनतेत पाण्याविषयी मोठी ओरड सुरू आहे.खुलताबाद शहराला गेल्या चार महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून १५ दिवसांआड नगर परिषदेकडून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागत असून खुलताबादचे माजी नगरसेवक निसारखाँ पठाण, मसियोद्दीन शुत्तारी, कलीमोद्दीन खुदबोद्दीन व नागरिकांनी गेल्या महिन्यात पाण्यासाठी न.प. कार्यालयासमोर उपोषण केले होते. यावेळी नगर परिषद प्रशासनाने दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले होते. तरीही नगर परिषद पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरली व १५ ते १७ दिवसांआड पाणीपुरवठा सुरूच होता. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत करावा, जनतेला मुबलक पाणी देण्यात यावे या मागणीसाठी निसारखान पठाण, मसियोद्दीन शुत्तारी, कलीमोद्दीन खुदबोद्दीन यांनी शनिवारी खुलताबाद येथे महामार्गावर रास्ता रोको करण्याचे निवेदन तालुका प्रशासनास दिले होते.शनिवारी सकाळी ११.३० वाजता वेरूळ टी पॉइंटवर रास्ता रोको आंदोलन सुरू झाले. एक तास आंदोलन सुरू होते. परंतु प्रशासनाच्या वतीने कुणीही निवेदन स्वीकारण्यास लवकर न आल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले. सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल बेंद्रे, दुर्गेश राजपूत यांनी वाहतूक व प्रवाशी खोळबंले असल्याचे सांगितले. परंतु तरीही कुणी ऐकून घेण्यास तयार नसल्याने वातावरण गरम झाले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू करताच दगडफेक सुरू झाली. यात औरंगाबाद -अक्कलकुंवा एस.टी.बस (एम.एच. २० डी.एस. २८७६) व पोलीस व्हॅनच्या (एम.एच.२० ए.एस. ५५९) काचा फोडण्यात आल्या. रास्ता रोको असतानाही अपुरा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले असून एस.टी. बसचालक व वाहकांनी बसचे नुकसान झाल्याची फिर्याद दिली.आंदोलकांचे निवेदन घेण्यासाठी न.प. मुख्याधिकारी किंवा तहसीलदार न आल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या दरम्यान, पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणावरून ८ जणांना उचलले. १५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यात निसारखान सरदारखान पठाण, नईम बेग करीम बेग, अबरार अहेमद, शेख वसीम शेख रियाज, महंमद रईस महंमद इसाक, महंद जुनेद कुरेशी, हनिफ कुरेशी, सय्यद हमीद सय्यद युसूफ, फिरोजखान शेरखान, सय्यद रशीद सय्यद जियाऊद्दीन, इलियास पठाण, जफर पठाण, शेख परवेज शेख वली, सय्यद जाफर सय्यद शकूर, सलमान शहा आदम शहा, शेख सर्फराज शेख युनूस आदींचा समावेश आहे. याशिवाय इतर ७५ ते १०० जणांविरूध्द विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. अधिक तपास सपोनि. एकनाथ पाटील हे करीत आहेत.प्रशासनच जबाबदारदरम्यान, आजच्या रास्ता रोको आंदोलनाचे निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्याधिकारी किंवा तहसीलदार कुणीच न आल्याने आंदोलक भडकले व त्यातूनच या आंदोलनास हिंसक वळण लागले, हे विशेष.

टॅग्स :Morchaमोर्चाKhulatabadखुल्ताबाद