शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जुना बायजीपुऱ्यात शेजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:02 IST

औरंगाबाद : भिंतीवर रजई टाकल्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ...

औरंगाबाद : भिंतीवर रजई टाकल्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास जुना बायजीपुरा येथे घडली. या घटनेत दोन्ही गटांचे सुमारे पाच जण जखमी झाले असून जिन्सी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंदविण्यात आले.

अदनान खान युसूफ खान आणि शहारूख खान शकील खान हे आपसांत नातेवाईक असून जुना बायजीपुरा येथे त्यांचे कुटुंब शेजारी राहतात. ११ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास अदनान यांचा लहान भाऊ अयास आणि आई शेजारी बंद असलेल्या घराच्या भिंतीवर रजई वाळू घालत होती. यावेळी आरोपी शकील खान रऊफ खान, शकीला बेगम, तोहरा, शहारूख आणि एका महिलेने त्यांना शिवीगाळ करून रजई वाळू घालण्यास मनाई करत मारहाण केली. अदनान खान, त्यांची आई आणि वडील हे त्यांना समजावून सांगत असताना आरोपींनी त्यांनाही धारदार वस्तूने मारहाण करून जखमी केल्याची तक्रार अदनानने नोंदविली.

दुसरीकडे, शहारूख यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या आईवडिलांना शेजारी राहणारे आरोपी युसूूफ खान रऊफ खान, अदनान युसूफ खान आणि त्याची आई मारहाण करीत असल्याचे पाहून भांडण सोडविण्यासाठी ते गेले असता त्यांनाही आरोपींनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. अदनानने फरशीच्या तुकड्याने डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. या घटनेचा तपास सहायक उपनिरीक्षक रोकडे करीत आहेत.