हणेगाव : सावळी येथील जिल्हा परिषद प्रशाळेतील प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षिकेस पुन्हा रूजू करावे व विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळावे या मागणीसाठी शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने १० जुलै रोजी कुलूप ठोकण्यात आले़ सावळी येथील जि़ प़ शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून १७५ विद्यार्थी पटसंख्या आहे़ शिवाय यावर्षीच्या शैक्षणिक हंगामात आठवीच्या वर्गासही मान्यता मिळाली आहे़ एस़ एऩ रेगोडे या शिक्षिकेची तात्पुरत्या अवधीसाठी केंद्रीय प्राथमिक शाळा लोणी येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे़ (वार्ताहर)
शिक्षिकेच्या नियुक्तीसाठी ग्रामस्थांनी ठोकले शाळेला टाळे
By admin | Updated: July 11, 2014 01:02 IST