शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
4
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
5
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
6
"पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
7
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
8
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
9
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
10
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
11
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
12
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
13
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
14
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
15
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
16
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
17
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
18
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
19
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
20
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जीवाची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीच्या गावा; बांधिलकीचा ठेवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2016 23:54 IST

टीम लोकमत , बीड भालचंद्र गणपती मंदिरामुळे जिल्ह्यात लौकिक प्राप्त करणाऱ्या लिंबागणेश (ता. बीड) या गावाने आता विकासाची कात टाकली आहे

टीम लोकमत , बीडभालचंद्र गणपती मंदिरामुळे जिल्ह्यात लौकिक प्राप्त करणाऱ्या लिंबागणेश (ता. बीड) या गावाने आता विकासाची कात टाकली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजतागायत मूलभूत सोयी-सवलती मिळविण्यासाठी झुंजावे लागले. मात्र, गेल्या तीन वर्षांत विकासाच्या खाणाखूणा दिसू लागल्या आहेत. आता ग्रामस्थांना आधुनिकतेची स्वप्नेही पडू लागली आहेत. गणपतीबाप्पांचा वरदहस्त लाभलेल्या या गावात सामाजिक बांधिलकी जपणारे लोकही आहेत. त्यामुळे माणुसकीचे ‘दर्शन’ पावलोपावली घडते.‘लोकमत’ने शनिवारी लिंबागणेश येथे ‘स्पॉट रिपोर्टिंग’ केले. यावेळी गावकऱ्यांनी उपेक्षा अन् अपेक्षा या दोहींची गोळाबेरीज मांडली. पाचशेवर उंबरे अन् तीन हजार लोकसंख्येचे हे गाव जिल्हा परिषदेचा गट आहे. बीड मतदारसंघाचे आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात याच गटातून झाली. परिसरातील १५ ते २० गावांचा लिंबागणेशमध्ये रोजचा संपर्क असतो. गावाला चिकटूनच भालचंद्र गणपतीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर सोळाव्या शतकातील आहे. हेमाडपंथी बांधकामाचा अजोड नमुना येथे पहावयास मिळतो. भाद्रपद महिन्यात येथे यात्रा भरते. भाविकांची मोठी श्रद्धा असलेल्या या मंदिराला विकासाची प्रतीक्षा आहे. मंदिरावर चोरांची सतत वक्रदृष्टी पडलेली आहे. दगडी शिळा चोरीला गेल्या होत्या; परंतु त्या जिल्ह्याच्या सीमेवर सापडल्या. तत्पूर्वी एकदा व २६ जानेवारी रोजी मंदिरातील दानपेटी फोडली, त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. चोरांनी दानपेटीला हात लावल्यावर सीसीटीव्ही बसविण्यास मुहूर्त मिळाला. भाविकांचा ओघ पाहता येथे पुरेशा सोयी- सुविधा नाहीत. त्यामुळे मंदिराचा समावेश तीर्थक्षेत्र विकास योजनेत करावा अन् मंदिराचा कायापालट करावा अशी मागणी गावकरी अनेक दिवसांपासून करताहेत. देवस्थानच्या नावे ६२ एकर जमीन असून मालकी हक्काचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे.प्रत्येक गल्लीत दर्जेदार रस्ते, सौरपथदिवे, शौचालये विकासाची साक्ष देतात. मात्र, स्वच्छतेचा अभाव आहे. सार्वजनिक शौचालयाची उणिव आहे. पोलीस चौकीला हक्काची इमारत आदी प्रश्न ऐरणीवर आहेत. सरपंचांनी जपली माणुसकीसरपंच सुषमा बाळकृष्ण मुळे या बारावी उत्तीर्ण. ग्रा. पं. अस्तित्वानंतर पहिल्या महिला सरपंचपदाच्या त्या मानकरी ठरल्या. गावच्या प्रश्नांची सोडवणूक त्या स्वत: करतात. महिलांचे प्र्शन त्या अतिशय संवेदनशीलपणे हाताळतात. निराश्रीत असलेल्या दोन जुळ्या बहिणींना त्यांनी दत्तक घेतले आहे. पोटच्या लेकरागत त्या त्यांना जीव लावतात. बचत गटातून आत्मसन्मान व स्वावलंबनाची चळवळ त्यांनी गतिमान केली आहे. त्यांचे पती बाळकृष्ण हे पत्नीच्या कामात कधी लूडबूड करत नाहीत. विकासाचे निर्णय ग्रामसभेत होतात. त्यात केवळ सरपंचाला खुर्ची असते. वंचित- उपेक्षितांसाठी सरपंच सुषमा व त्यांचे पती बाळकृष्ण हे दोघे कायम मदतीला उभे राहतात.अंगणवाडी इमारतीची दुरवस्था तीनपैकी एका अंगणवाडीच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. शौचालयाची सुविधा नाही. त्यामुळे बालके, कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. उर्वरित दोन अंगणवाड्या सुविधायुक्त आहेत.तलाठी गायबतलाठी एस. एम. पुराणिक गायब होते. खासगी मदतनीस कागदपत्रे चाळताना आढळला.