शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणावर मात करण्यासाठी अंगणवाड्यांमध्ये सुरु होणार ग्राम बाल विकास केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 17:49 IST

कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये नव्याने ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देयाशिवाय अंगणवाड्यांमध्ये कुपोषित बालकांची आॅनलाईन नोंदणी केली जाणार आहे.

औरंगाबाद : कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये नव्याने ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय अंगणवाड्यांमध्ये कुपोषित बालकांची आॅनलाईन नोंदणी केली जाणार आहे. यामुळे कोणत्या जिल्ह्यात किती बालके कुपोषित आहेत, याचा गावनिहाय शोध घेणे सोपे होणार आहे, असे जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण विभागात नुकतेच रुजू झालेले महिला व बालविकास अधिकारी प्रल्हाद मिरकले यांनी सांगितले.

यापूर्वीचे महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांची बदली अहमदनगर जिल्हा परिषदेत झाली. ते तीन दिवसांपूर्वीच येथून कार्यमुक्त झाले. त्यांच्या जागेवर प्रल्हाद मिरकले हे रुजू झाले आहेत. महिला व बालकल्याण विभागाची सूत्रे घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, अंगणवाड्यांमध्ये नव्याने कार्यरत केल्या जाणाऱ्या ग्राम बाल विकास केंद्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

तीव्र कमी वजनाची बालकांची, तसेच वजन व उंची कमी (सॅम) असलेल्या बालकांची संख्या कमी करण्यासाठी, अर्थात कुपोषण कमी करण्यासाठी ग्राम बाल विकास केंद्रांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. अंगणवाड्यांमार्फत पोषण आहार दिला जातो. याशिवाय काही बालके आजारी असल्यास त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत संदर्भ सेवाही दिल्या जातात. प्रामुख्याने ग्राम बाल विकास केंद्रांमध्ये तीव्र कुपोषित (सॅम) बालकांना प्रवेश दिला जाणार आहे. यात सहा महिने ते सात वर्षांपर्यंतच्या बालकांचा समावेश असेल. या बालकांना पालक हे नियमितपणे ग्राम बाल विकास केंद्रांमध्ये घेऊन येतील. दिवसभर अंगणवाडी सेविका व मदतनीस त्यांची देखभाल करतील. आरोग्याची टीमही बालकांच्या तपासणीसाठी तैनात असेल, असे मिरकले म्हणाले.

यापुढे अंगणवाड्यांमार्फत कुपोषित वर्गवारीनुसार कुपोषित बालकांची आॅनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मंत्रालयात बसून कुपोषित बालकाचे नाव शोधता येणार आहे. कुपोषित बालकांना मूग, मठ मोडीची उसळ यासह इतर पौष्टिक आहार दिला जाणार आहे. 

बालविकास केंद्राचे नेमके काम काय असेलबाल ग्राम विकास केंद्रामार्फत सॅम अर्थात तीव्र कुपोषित बालकांचा सर्वंकष विकास सुनिश्चित करण्यावर भर दिला जाईल. औषधोपचारातही परिणाम न दिसणाऱ्या ‘सॅम’ बालकांची सविस्तर तपासणी करणे, जिल्हा परिषदेचे एकात्मिक बालविकास केंद्र, तसेच आरोग्य विभागामार्फत ‘सॅम’ बालकांच्या पालकांचे समुपदेशन करणे, तीव्र कुपोषित बालकांची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. 

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदState Governmentराज्य सरकारHealthआरोग्य