शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यात होणार व्हिजिटर मॅनेजमेंट; येणाऱ्या प्रत्येकाची राहणार नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 19:24 IST

कामानिमित्त पोलीस ठाण्यात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची छायाचित्रासह संगणकात नोंद घेतली जात आहे.

ठळक मुद्देशहरातील पोलीस ठाण्यांत येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराची नोंद घेण्यास सुरुवात झाल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.

औरंगाबाद : कामानिमित्त पोलीस ठाण्यात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची छायाचित्रासह संगणकात नोंद घेतली जात आहे. पोलीस महासंचालकांच्या आदेशाने राज्यातील सर्वच ठाण्यांत व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली. यांतर्गत शहरातील पोलीस ठाण्यांत येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराची नोंद घेण्यास सुरुवात झाल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.

शहरातील कोणत्याही ठाण्यात गेल्यानंतर प्रथम तेथील स्वागत कक्षातील पोलीस कर्मचाऱ्यांकडे तुमचे नाव सांगावे लागेल. एवढचे नव्हे तर संगणकाशी जोडण्यात आलेल्या कॅमेऱ्याद्वारे तुमचे छायाचित्रेही घेतली जाणार आहेत. शहरातील काही पोलीस ठाण्यांत सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू झाली. तक्रार देण्याकरिता अथवा अन्य कोणत्याही कामासाठी पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती जमा करण्याचे आदेश राज्य शासनाने पोलिसांना दिले. त्यानुसार शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांत आता स्वागतकक्ष उभारण्यात येत आहे. 

याविषयी पोलीस आयुक्त  म्हणाले की, व्हिजिटर मॅॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीची तक्रार घेण्यात आली अथवा नाही, पोलिसांकडून त्यांचे समाधान झाले अथवा नाही, याबाबतची नोंदही एका कॉलममध्ये घेतली जाणार आहे. 

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादState Governmentराज्य सरकार