लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जायकवाडी धरणात वरील धरणांतून होणार विसर्ग आणि संभाव्य मुसळधार पावसाचा अंदाज या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गोदावरील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जायकवाडी धरण ७८.८१ टक्के क्षमतेने भरलेले आहे. वरील धरणांतून पाणी येत असल्यामुळे जायकवाडीतून ्रकधीही विसर्ग सोडण्यात येऊ शकतो. धरणाच्या खालील भागात चार कि.मी. अंतरावरील चनकवाडी बंधाºयाचे सध्या दरवाजे काढून गोदावरीचा पाणी प्रवाह मोकळा केलेला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सोडला असता धरणाखालील भागातील गोदाकाठच्या गावांना पुराचा धोका होऊ शकतो. गोदाकाठावरील नागरी भागामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच संभाव्य (पूर) आपत्कालिन परिस्थितीत आपत्कालिन साहित्याचा उपयोग करावा, असे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी कळविले आहे.
गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:52 IST