शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहर पोलीस अ चा मनपावर संघावर दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:01 IST

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक टी-२० करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस अ संघाने मनपा संघावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. दुसºया सामन्यात आयआयए संघाने एमआर इलेव्हन संघावर ६ गडी राखून मात केली. आयआयएचा शुभम हरकळ आणि शहर पोलीसचा राहुल जोनवाल हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.

ठळक मुद्दे शुभम हरकळ, राहुल जोनवाल सामनावीर

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक टी-२० करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस अ संघाने मनपा संघावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. दुसºया सामन्यात आयआयए संघाने एमआर इलेव्हन संघावर ६ गडी राखून मात केली. आयआयएचा शुभम हरकळ आणि शहर पोलीसचा राहुल जोनवाल हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.सकाळच्या सत्रात मनपा संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १२३ धावा केल्या. त्यांच्याकडून अल्ताफ खान याने ५ चौकार, एका षटकारासह नाबाद ५०, कर्मवीर लव्हेराने २२, दीपक जावळेने १७ व सचिन लव्हेराने १२ धावा केल्या. शहर पोलीसकडून संजय पाटील व शेख जिलानी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात शहर पोलीसने विजयी लक्ष्य १६.५ षटकांत २ फलंदाज गमावून गाठले. त्यांच्याकडून राहुल जोनवाल याने ३ षटकार व ७ चौकारांसह नाबाद ६८ व कर्णधार गिरिजानंद भक्त याने १ चौकार व एका षटकारासह नाबाद २७ धावा केल्या. शेख मुकीमने १४ धावा केल्या. मनपाकडून प्रवीण क्षीरसागर व रईस अहमद यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुसºया लढतीत एमआर इलेव्हनने २० षटकांत ८ बाद १५४ धावा केल्या. त्यांच्याकडून आठव्या क्रमांकावर फलंदाजीस येत अनिरुद्ध शास्त्री याने २७ चेंडूंत ४ षटकार व ५ चौकारांसह नाबाद ५६, अब्दुल गफूरने ३९ धावा केल्या. आयआयएकडून समीर यादव व मिर्झा मसूद यांनी प्रत्येकी २, तर अनंत नेरळकर व रझा कुरैशी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात आयआयए संघाने विजयी लक्ष्य १७.५ षटकांत ४ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून शुभम हरकळ याने ६३ चेंडूंत ६ षटकार व ८ चौकारांसह नाबाद ९० धावांची तडाखेबंद खेळी केली. अनंत नेरळकरने २०, युसूफ शेखने १३ धावा केल्या. एमआर इलेव्हनकडून अनिरुद्ध शास्त्रीने २, तर ईशांत रायने १ गडी बाद केला.