शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या विजयात बीडची मुक्ता मगरे चमकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 23:56 IST

राजकोट येथे सुरू असलेल्या महिलांच्या २३ वर्षांखालील झोनल वनडे क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने बडोदा संघावर ४९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या लढतीत बीडची खेळाडू मुक्ता मगरे हिने निर्णायक योगदान दिले. महाराष्ट्राचा हा सलग दुसरा विजय ठरला.

ठळक मुद्देझोनल वनडे क्रिकेट : बडोदा संघावर मात

औरंगाबाद : राजकोट येथे सुरू असलेल्या महिलांच्या २३ वर्षांखालील झोनल वनडे क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने बडोदा संघावर ४९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या लढतीत बीडची खेळाडू मुक्ता मगरे हिने निर्णायक योगदान दिले. महाराष्ट्राचा हा सलग दुसरा विजय ठरला.आज झालेल्या या लढतीत कर्णधार देविका वैद्य आणि मुक्ता मगरे यांनी सलामीसाठी २६.४ षटकांत केलेल्या १२७ धावांच्या भागीदारीच्या बळावर महाराष्ट्राने ५0 षटकांत ७ बाद २३३ धावा फटकावल्या. महाराष्ट्राकडून देविका वैद्य हिने ७४ चेंडूंत ९ चौकारांसह ६९, तर मुक्ता मगरे हिने ९२ चेंडूंत ६ चौकारांसह ५७ धावांची सुरेख खेळी केली. या दोघींशिवाय शिवाली शिंदेने ४२ चेंडूंत ५ चौकारांसह ४0 धावांचे योगदान दिले. बडोदा संघाकडून एन. पटेल हिने ४१ धावांत ३ गडी बाद केले. रिद्धी मौर्य हिने ४४ धावांत २ बळी घेतले.प्रत्युत्तरात बडोद्याचा संघ ५0 षटकांत ६ बाद १८४ या धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्याकडून ऋत्विषा हिने ६९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ६९ धावांची झुंजार खेळी केली. एन. पटेलन २७ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्राकडून निकिता भोर, शिवानी भुकटे, माया सोनवणे व तेजल हसबनीस यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.संक्षिप्त धावफलकमहाराष्ट्र : ५0 षटकांत ७ बाद २३३. (देविका वैद्य ६९, मुक्ता मगरे ५७, शिवाली शिंदे ४0. एन. पटेल ३/४१, रिद्धी मौर्य २/४४).बडोदा : ५0 षटकांत ६ बाद १८४. (ऋत्विषा ७३, एन. पटेल २७. निकिता भोर १/२८, शिवानी भुकटे १/३७, माया सोनवणे १/२५, तेजल हसबनीस १/१२).