शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चंदीगडची विजयी घौडदौड, हिमाचल संघाला पराभवाचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 01:11 IST

साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात सुरू असलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत चंदीगडने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली, तर हिमाचाल संघाला पराभव पत्करावा लागला. चंदीगडने सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना आज हिमाचल संघावर ७-२ असा दणदणीत विजय मिळवला. या विजयासह चंदीगड संघ अ गटात सहा गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे.

औरंगाबाद : साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात सुरू असलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत चंदीगडने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली, तर हिमाचाल संघाला पराभव पत्करावा लागला.चंदीगडने सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना आज हिमाचल संघावर ७-२ असा दणदणीत विजय मिळवला. या विजयासह चंदीगड संघ अ गटात सहा गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे. चंदीगडकडून हरप्रीतसिंगने ९ व्या व २५ मिनिटाला गोल केले. यशदीपने १९ व्या, अमनदीपने २८ व ५७ व्या मिनिटाला, सुखजितसिंगने ३८ व्या व सुखमनसिंग याने ४५ व्या मिनिटाला गोल केले. हिमाचलकडून वाशू देव आणि चरणजितने गोल केले.क गटातील सामन्यात कर्नाटक व उत्तर प्रदेश या संघात २-२ अशी बरोबरी झाली. उत्तर प्रदेशकडून शारदा तिवारीने २६ व शिवम आनंदने ४० व्या मिनिटाला गोल केले, तर कर्नाटककडून अजित व्ही. एम.ने ३७ व सात्त्विक एच. आर.ने ५१ व्या मिनिटाला गोल केला. ब गटातील लढतीत मध्यप्रदेशने मुंबई संघावर ६-१ अशी मात केली. मध्य प्रदेशकडून विकास रजकने ४ थ्या व ४३ व्या असे दोन गोल केले. आलिशान याने १६ व्या व २० व्या मिनिटाला, तर प्रियोताबा तालेमने १० व्या व आदर्श हर्दुआ याने २३ व्या मिनिटाला गोल केले. मुंबईकडून मोहित कथोटेने ५३ व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर एकमेव गोल केला. ड गटातील लढतीत हॉकी ओडिशा संघाने पंजाब अँड सिंध संघावर १-० अशी मात केली. कृष्णा तिर्की याने २३ व्या मिनिटाला ओडिशाकडून विजयी गोल केला. ड गटात झालेल्या सामन्यात बिहारने एसपीएसबीवर २-१ गोलने मात केली. विजयी संघाकडून सचिन डुंगडुंगने ३४ व संचित होरो याने ५१ व्या मिनिटाला गोल केला. एसपीएसबीकडून एकमेव गोल रजत मिन्झने २९ व्या मिनिटाला केला.बुधवारचे सामने :सकाळी ७ वा. हॉकी पंजाब वि. चंदीगडस. ८.३० वा. : एसएससीबी वि. तामिळनाडूस. १० वा. : हरियाणा वि. मध्यप्रदेश११.३० वा. झारखंड वि. मणिपूरदुपारी १ वा. गंगपूर ओडिशा वि. उत्तर प्रदेशदु. २.३० वा. : महाराष्ट्र वि. दिल्लीदुपारी ४ वा. भारतीय क्रीडा प्राधिकरण वि. बिहार