शांतीलाल गायकवाड, औरंगाबादशिवसेनेत लोकशाहीचे दरवाजे किलकिले करू पाहणाऱ्या पक्षनेतृत्वाच्या निर्णयाला मूठमाती देण्यासाठी दुसऱ्या फळीतील नेतृत्वाने कंबर कसली असून, विरोधी आवाज व मत व्यक्त करणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा बळी घेणे सुरू केले आहे. कन्नडचे विद्यमान आ. हर्षवर्धन जाधव यांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध करणाऱ्या गटातील एकाच निष्ठावंत शिवसैनिकाला तडकाफडकी पदमुक्त करून इतरांची गळचेपी करण्यात आली आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शहरात येऊन मराठवाडा विभागातील पदाधिकाऱ्यांच्या विधानसभानिहाय भेटी घेत त्यांची मते जाणून घेतली होती. या भेटीत कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांच्या तक्रारी पक्षनेतृत्वाकडे करण्यात आल्या होत्या. त्यांच्याऐवजी कुणाही सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी द्या, त्याला आम्ही निवडून आणतो, अशी मागणी करणारे तालुक्यातील प्रमुख २५ पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे ४ पानी निवेदन उद्धव ठाकरे यांना देण्यात आले होते. उपजिल्हाप्रमुख पदमुक्तठाकरे यांच्यासमोर झालेल्या तणातणीचे वृत्त लोकमतमधून प्रसिद्ध होताच उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांना गुरुवारी सायंकाळीच तडकाफडकी पदमुक्त करण्यात आले. त्यांना पदमुक्त करण्याचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. विशेष म्हणजे उपरोक्त मागणी करणाऱ्या तालुक्यातील इतर पदाधिकाऱ्यांना मात्र अभय देत, सूचक इशारा देण्यात आला आहे. पक्षात दुखावले कोण ? आमदार जाधव यांच्यावरून ठाकरे यांच्यासमोर झालेल्या वादावादीमुळे स्थानिक नेते, जिल्हा पदाधिकारी चक्रावले. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, माजी आमदार नामदेव पवार यांनी काँग्रेसमध्ये केलेल्या प्रवेशाची भरपाई व उद्धव-राज भांडणात मनसेचा आमदार फोडण्याचे कसब दाखवीत पक्षनेत्याला खुश करण्यासाठी खा. चंद्रकांत खैरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जाधव यांना शिवसेनेत आणले होते. जाधव यांना सेनेत आणण्यासाठी विधानसभेच्या उमेदवारीची हमीही देण्यात आली होती. जाधव यांच्या उमेदवारीला विरोध म्हणजेच खैरे यांच्या भूमिकेला विरोध असल्याचे मानले गेले असावे, अशी चर्चा आज दिवसभर शिवसेनेच्या वर्तुळात होती. मला पक्षाने पदमुक्त केले आहे. पक्षादेश मानणारा मी कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करीत राहील. पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही. मी निष्ठावंत असून गद्दार नाही. राजेंद्र राठोड, पदमुक्त उपजिल्हाप्रमुखराजेंद्र राठोड यांना पदमुक्त करण्याचा पक्षादेश होता. त्यानुसार आदेश बजावले. पदमुक्तीचे कारण सांगता येणार नाही. पक्ष नेत्याला भेटण्यासाठी वाद घालणारे जालन्याचे नगरसेवक बाबू पवार व हे प्रकरण वेगळे आहे. अंबादास दानवे,जिल्हाप्रमुख शिवसेना.
आमदारासाठी निष्ठावंताचा घेतला बळी
By admin | Updated: July 26, 2014 01:10 IST