शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घाटनांद्रा येथे ५५ वर्षापूर्वीच्या जीर्ण इमारतीमध्येच चालतो पशुवैद्यकीय दवाखाना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 20:45 IST

इमारतीची दुरूस्ती न करताना नवीन इमारतीसाठी निधी द्यावा, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा बेजाबदारपणा पशुपालकांकडून नव्या इमारतीची मागणी 

घाटनांद्रा (औरंगाबाद ) : जवळपास ५५ वर्षापूर्वी बांधलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीची प्रशासनाने पाचव्यांदा डागडुजी सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे मोडकळीस असलेल्या या इमारतीची दुरूस्ती नव्हे तर नवीन इमारत बांधण्याची गरज असून पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन इमारतीची दुरूस्ती न करताना नवीन इमारतीसाठी निधी द्यावा, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.

येथील पशुपालकांनी सांगितले की, घाटनांद्रा येथील पशूवैद्यकीय दवाखान्याच्या ५० वर्ष जून्या इमारतीवर शासनाने केवळ दुरूस्तीवर आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले आहे. आतापर्यंत पाच ते सहा वेळेच या इमातरीची दुरूस्ती झाली असून आता पुन्हा या जीर्ण झालेल्या इमारतीसाठी शासनाने पाच लाख रूपये निधी देऊन केला आहे. मात्र, या निधीमध्ये थातुरमातुर काम होत असल्याने शासनाने पडण्याच्या मार्गावर असलेल्या इमारतीच्या दुरूस्तीऐवजी नवीन इमारतीसाठीच निधी द्यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 

येथील बसस्थानक परिसरात ११ गुंठे मालकीची जागा आसलेले या पशूवैद्यकीय श्रेणी एकचा दवाखान्याची ६०० ते ७०० स्क्वेअर फूट आकाराची १९६४ मध्ये बांधकाम झालेली ईमारत आहे. ११ गुंठे मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यानेही ईमारत चोही बाजूंनी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. मात्र, शासनाच्या वतीने हे अतिक्रमण काढण्याच्या कोणत्याच हालचाली होत नाही, याबाबत येथील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

दुरूस्तीचा खर्च जाणार पाण्यात - ५५ वर्ष जुन्या या इमारतीचे दुरूस्ती केल्यानंतर खर्च पूर्णपणे पाण्यात जाणार आहे. इमारतीच्या स्लॅबला जागोजागी तडे गेल्यामुळे दुरूस्तीनंतर पावसाळ्यात स्लॅब गळतो. तसेच इतर कामेही थातुरमातूर पद्धतीने केली जात असल्याने दुरूस्तीचा कोणताही फायदा होत नाही. मात्र, तरीही प्रशासन नवी इमारत न बांधून देता वारंवार दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून देत आहे. याबद्दल नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.  त्याऐवजी नवीन इमारत बांधुन द्यावी, अशी मागणी होत आहे. 

नविन इमारती विषयी जि.प. चे उपविभागीय अभियंता कल्याण भोसले म्हणाले, दूरूस्तीचे काम चांगल्या प्रकारचे करण्यात येणार असून नवीन इमारतीसाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिल्यास प्रस्ताव तयार करून शासनाकडून इमारतीसाठी मागणी करण्यात येईल. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबाद