शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
2
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
3
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पंना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
4
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
5
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
6
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
7
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
8
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
9
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
10
वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
11
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
12
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
13
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
14
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
15
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
16
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
17
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
18
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
19
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलिवर रुग्णवाहिका आदळली

By admin | Updated: November 29, 2015 23:17 IST

उस्मानाबाद : तालुक्यातील खामगाव पाटीजवळ उभा असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर रुग्णवाहिका आदळली आणि त्याचवेळी उस्मानाबादहून कळंबकडे जाणारी जीपही

उस्मानाबाद : तालुक्यातील खामगाव पाटीजवळ उभा असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर रुग्णवाहिका आदळली आणि त्याचवेळी उस्मानाबादहून कळंबकडे जाणारी जीपही ट्रॉलीवर आदळल्याने झालेल्या तिहेरी अपघातात दोन गर्भवती महिलांसह १३ जण जखमी झाले़ जखमींवर उस्मानाबाद येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, गंभीर जखमी दोघांना सोलापूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे़ हा अपघात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला असून, या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका (क्ऱएम़एच़२६- आऱ९००४) ही शनिवारी रात्रीच्या सुमारास गरोदर मातांना घेवून उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयाकडे निघाली होती़ ही रुग्णवाहिका भडाचीपाटी जवळ आली असता रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली रुग्णवाहिकेच्या चालकाला दिसली नाही़ परिणामी रुग्णवाहिका ट्रॉलीवर धडकली़ त्याचवेळी उस्मानाबादहून कळंबकडे निघालेली जीप (क्ऱएम़एच़१४- २६७८) आली आणि ती जीपही त्या ट्रॉलीवर आदळली़ या अपघातात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ प्रविण यादव यांच्यासह गणेश भोसले (वय-२७), शरद रितापुरे (वय-३४ दोघे रा़ मंगरूळ), श्रीराम पवार (वय-३५ रा़ जवळा), गुणवंत विखे (वय-३५ रा़सांगवी), संदीप बारबोले (वय-३०), गिरजाबाई बारबोले (वय-५५), पल्लवी बारबोले (वय-२० सर्व रा़ कसबे तडवळे), प्रतिभा देशमुख (वय-३६), विष्णू क्षीरसागर (वय- ३५), श्रध्दा साठे (वय-२६), सुरेखा तिवारी (वय-२९ सर्व रा़ढोकी) व इतर एक अनोळखी हे १३ जण जखमी झाले़ अपघाताची माहिती मिळताच १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलाविण्यात आली़ रुग्णवाहिकेतील डॉ़ महेश घोळवे आणि चालक विकास चंदनशिवे यांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने यंत्रणा हलवून जखमींवर उपचार केले़ यातील दोन गंभीर जखमींना उपचारासाठी सोलापूर येथे रेफर करण्यात आले होते़ तर गरोदर मातांना स्त्री रुग्णालयात रेफर करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)