शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

भाजीविक्रेत्याच्या मुलीला व्हायचंय डॉक्टर!

By admin | Updated: June 18, 2014 01:42 IST

आशपाक पठाण , लातूर कुटुंबात आठराविश्व दारिद्र्य़ मुलं अभ्यास करतात की नाही काय हे बघायला पालकाला वेळही नाही़

आशपाक पठाण , लातूरकुटुंबात आठराविश्व दारिद्र्य़ मुलं अभ्यास करतात की नाही काय हे बघायला पालकाला वेळही नाही़ सकाळी ६ वाजता भाजीपाल्याचा गाडा घेऊन बाहेर पडणारे पालक रात्री कधी दहा तर कधी १२ वाजता घरी पोहचतात़ पण मुले शिकली पाहिजेत, यासाठीच जिवाचं रान करीत शालेय साहित्यांसाठी कधीच नकार दिला नाही़ पालकांच्या कष्टाचं चिज व्हावं, यासाठी घरात मोठी असलेल्या मुलीने दहावीच्या परिक्षेत ८९ टक्के गुण घेऊन यश संपादन केले़ ९५ ते ९७ टक्के गुणाची अपेक्षा बाळगून असलेली निलोफर शेख कमी गुण पडल्याची खंत व्यक्त करीत डॉॅक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे़भाजीविक्रीच्या व्यवसायातून वडिल दररोज २०० ते ३०० रूपये कमावतात़ एकट्या कमावत्या व्यक्तीवर घरातील ९ जणांचा भाऱ आई, दोन बहिणी, पत्नी, तीन मुले असा परिवाऱ निलोफर शेख घरात थोरली़ दोन भाऊ एक आठवी व दुसरा नववीच्या वर्गात शिक्षण घेतोय़ तीन मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह भाजीच्या गाड्यावर भागवायचा असल्याने शाळेतील शिक्षणाशिवाय इतर सोय नव्हती़ कोणत्याच विषयासाठी खाजगी शिकवणी वर्गाच्या दारात पायही ठेवला नाही़ लातूर शहरातील चौधरी नगर भागातील सय्यद अख्तरअली शाह उर्दु शाळेत शिक्षण घेत असलेल्या निलोफरला मुख्याध्यापक मजहर शेख यांच्यासह इतर विषयाच्या शिक्षकांनी नेहमीच मार्गदर्शन केले़ घरापासून जवळपास एक किलोमीटरचे अंतर तुडवत निलोफर शाळा गाठायची़आईचे शिक्षण दहावीपर्यंत पण तिला उर्दु भाषेचे ज्ञान नसल्याने आईनेही कधी अभ्यासात लक्ष दिले नाही़ शिक्षण चांगलं घ्या़़़ तुम्हाला मोठं व्हायचंय़़़ एवढेच शब्द आईचे ठरलेले असतात, असे निलोफर सांगत होती़ आता विज्ञान शाखेत प्रवेश घेणार असून डॉक्टर बनण्यासाठी जिद्दीने अभ्यास करणार आहे़ पहाटे ५ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत अभ्यासात रमणाऱ्या निलोफरच्या यशाचं कौतुक शाळेत करण्यात आले़ वडिल इस्माईल शेख व निलोफरचा संस्थेचे सचिव हाजी बशीर शेख यांनी सत्कार केला़ शाळा करणार मदत़़़एच़पी़ शैक्षणिक संकुलाचे सचिव हाजी बशीर शेख म्हणाले, निलोफरच्या शिक्षणासाठी संस्थेकडून मदत करण्यात येईल़ अर्थिक अडचणीमुळे तिचे शिक्षण बंद पडू दिले जाणार आहे़ पालकाची अर्थिक परिस्थिती बिकट आहे़ मुलीमध्ये शिक्षणाची जिद्द आहे, त्यामुळे शाळेकडून मदतीचा हात दिला जाईल़शिकेल तेवढे शिकविणाऱ़़माझ्या मुलीला शिक्षणाची जिद्द आहे़ वर्षभर तिने कधीच कुठल्या पुस्तकासाठी हट्ट धरला नाही़ तिने स्वत:हून अभ्यास केला़ घरात नऊ जणांचे कुटुंब आहे,मी एकटा कमावता असल्याने जास्तीचा खर्चही करणे शक्य नाही़ सकाळपासून रात्री उशिरापर्यंत काम करतो़ यापुढे अजून जास्तीची मेहनत करीऩ मुलगी जिथवर शिकेल तिथवर तिला शिकविणार, असे भावूक झालेले पालक इस्माईल शेख यांनी सांगितले़