शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीनंतरही आरटीओत वाहनांना लावले जाताहेत वेगळे कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 18:58 IST

आरटीओत केली जातेय विविध टॅक्सची वसुली

ठळक मुद्देनव्या वाहनांना २८ टक्के जीएसटी  वाहनधारकांना हजारो रुपयांचा भुर्दंड

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : देशात मोठा गाजावाजा करून ‘एक देश, एक करप्रणाली’ म्हणून जीएसटी लागू करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात एक करप्रणाली नावालाच आहे. नव्या वाहनांवर २८ टक्के जीएसटी आकारला जातो. त्यानंतरही आरटीओ कार्यालयात वेगवेगळ्या करांच्या नावाखाली वाहनधारकांचा खिसा रिकामा केला जात आहे. त्यातून सर्वसामान्य वाहनधारकांना दररोज हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

देशात जीएसटी लागू झाल्यानंतर इतर सर्व कर आकारणी बंद होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती. परंतु तसे नसल्याची प्रचीती वाहनधारकांना येत आहे. एकीकडे ‘जीएसटी’मुळे वाहनांच्या किमती कमी झाल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे ‘जीएसटी’मुळेच वाहनांच्या विक्रीत घट झाल्याचेही बोलले जात आहे. नव्या वाहनांवर २८ टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. ‘जीएसटी’च्या आकारणीनंतरही वाहनधारकांची आरटीओ कार्यालयातील करांच्या आकारणीपासून सुटका झालेली नाही. 

११  टक्क्यांपर्यंत करआरटीओ कार्यालयात वाहनांच्या किमतीच्या ११ टक्क्यांपर्यंत कर (एमव्ही टॅक्स) आकारला जातो. वाहनांच्या किमती आणि प्रकारानुसार कराची वसुली होते. त्यानंतर रोड सेफ्टी टॅक्सही आकारला जातो. वाहनधारकांना देण्यात येणाऱ्या पावतीत याचा कर म्हणूनच उल्लेख आहे. परंतु तो कर नसून अधिभार असल्याचे सांगितले जाते. याबरोबर परिवहन संवर्गातील वाहनांसाठी व्यवसाय कर वसूल केला जातो. 

दुचाकीला  ६ हजारांपर्यंत कर५४ हजार रुपये किंमत असलेल्या दुचाकी वाहनांसाठी ‘एमव्ही’ टॅक्सपोटी वाहनधारकांस ५ हजार ९७० रुपयांचा कर भरावा लागतो. वाहन जेवढे महाग तेवढा कर वाढत जातो. रोड सेफ्टी टॅक्स म्हणून १२० रुपये आकारले जातात. 

सर्व ‘जीएसटी’त यावेवाहनांवर २८ टक्के जीएसटी आहे. काही विशिष्ट वाहनांवर सेस लावून ४० टक्क्यांपर्यंत जीएसटी जातो. टोलही भरल्या जातो. वाहनांसाठी वनटाईम टॅक्स घेतला जातो. एक देश एक करप्रणाली म्हटले जाते. त्यामुळे हे सगळे ‘जीएसटी’मध्ये आले पाहिजे. वाहनांवर जीएसटी लावला जातो. पुन्हा आरटीओचे टॅक्स लावले जातात. यातून वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक होत आहे.- रोहन आचलिया, अध्यक्ष, औरंगाबाद सीए संघटना

...तर वाहन स्वस्त‘जीएसटी’ आकारणीमुळे आरटीओ कार्यालयातील कर आकारण्यात आले नाही तर वाहन खरेदी ग्राहकांसाठी स्वस्त होईल. परंतु हे आकारण्यात आले नाही तर रस्त्यांच्या देखभालीसाठी जो पैसा लागतो, तो कुठून येणार, असाही प्रश्न उभा राहू शकतो.- हेमंत खिंवसरा, वाहन वितरक

राज्य शासनाचा विषयजीएसटी आणि आरटीओ कार्यालयातील कर याचा विचार केला तर एकच कर आकारता येऊ शकतो. केंद्रीय पद्धतीने हा कर गोळा करता येईल. परंतु वाहनांसंबंधी कागदपत्रे, सर्टिफिकेशन आदींसाठी राज्याचे शुल्क आहेत. त्यामुळे हा राज्य शासनाचा विषय आहे.-राहुल पगारिया, वाहन वितरक

तरतुदीप्रमाणे कर आकारणीमहाराष्ट्र व्हेईकल टॅक्स  (एमव्ही टॅक्स) वाहनांच्या किमतीनुसार आकारला जातो. रोड सेफ्टी टॅक्स नसून तो अधिभार आहे. परिवहन संवर्गातील वाहनांसाठी (रिक्षा सोडून) व्यवसाय कर आकारला जातो. हा कर व्यवसाय खात्याकडून आकारला जातो. शासनाने विहित केलेले आणि कायद्यात तरतूद केल्याप्रमाणे कर आकारण्यात येत आहे.-सतीश सदामते, प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTaxकरGSTजीएसटी