शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांनो लक्ष द्या; रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांबाहेरील वाहने पोलीस उचलणार

By मुजीब देवणीकर | Updated: October 5, 2023 18:47 IST

व्यापारी महासंघ, मनपा-पोलिसांची संयुक्त बैठक

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य रस्त्यांवर पांढरे पट्टे मारण्यात येतील. या पट्ट्यांच्या बाहेर दुचाकी, चारचाकी वाहने उभी असल्याचे निदर्शनास आले, तर कारवाई करण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी रात्री स्मार्ट सिटीच्या कार्यालयात एका बैठकीत घेण्यात आला.

पोलिस आयुक्त मनोज लोहिया, मनपा प्रशासक जी. श्रीकांत, व्यापारी महासंघ पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत पार्किंगला शिस्त लावण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. व्यापारी महासंघाने विविध सण येत आहेत, काही दिवस कारवाई करू नये, अशी मागणी केली. मात्र, ही मागणी मान्य करण्यात आली नाही. शहरातील मुख्य रस्त्यांवर पट्टे नाहीत, असा मुद्दा समोर करण्यात आला. हा मुद्दा ग्राह्य धरून लवकरच सर्व प्रमुख मार्गांवर पट्टे मारण्याचे निश्चित झाले.

पोलिसांच्या सूचनेनुसार ज्या मार्गावर पांढरे पट्टे मारण्याची गरज आहे, तेथे मनपा पट्टे मारून देईल. वाहनावर कारवाई करताना अनाउन्समेंट करणे आवश्यक आहे. वाहन उचलणाऱ्या खाजगी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना गणवेश असावा, हे कर्मचारी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असू नयेत, याची पडताळणी एका दिवसात पाेलिस करून देतील, असेही बैठकीत ठरले. कारवाईच्या वाहनांवर व्हिडीओ कॅमेरा असेल, वाहने उचलताना वेळ, ठिकाण नमूद असल्याचा फोटो काढणे बंधनकारक राहील. दंड भरताना काही शंका असल्यास नागरिकांना पडताळणी करता येईल. सध्या जप्त केलेली वाहने गरवारे मैदान, छावणी येथे नेण्यात येत होती. नागरिकांच्या सोयीसाठी उड्डाणपुलांखाली काही ठिकाणी सोय करण्यात येईल.

असे असतील दंडवाहतूक पोलिसांकडून सणांसाठी तात्पुरत्या स्वरूपात काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून दिली जाणार आहे. नागरिकांना वाहन परत देताना मालकी हक्कासंदर्भात पडताळणी केली जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. दुचाकीसाठी २०० रुपये, हातगाड्या ३००, चारचाकीला जामर लावला तर ५०० रुपये, वाहन टोइंग करून नेल्यास २ हजार रुपये दंड राहील. याशिवाय नो पार्किंगमध्ये वाहन असेल तर वेगळा दंड आकारला जाईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडी