शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वाहन बाजार, घर खरेदी जोमात; दसऱ्याला शहरात ५०० कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 15:28 IST

सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स बाजारात गतवर्षीच्या तुलनेत मंदी 

ठळक मुद्दे150 कोटींचे बांधकाम व्यवहार 02 कोटींचे मोबाईल विक्री

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : दसऱ्याचा मुहूर्त साधत औरंगाबादकरांनी दणदणीत नवीन खरेदी केली. बाजारात ५०० कोटींची उलाढाल झाली. यात वाहन व बांधकाम व्यवसाय नंबर वन राहिले.  

बाजारात वर्षभर नवीन उत्पादने विकली जातात, तरी मुहूर्तावरील खरेदी शुभ मानणारा मोठा ग्राहक वर्ग आहे. रविवारी सकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने  व्यापारी वर्गाची काळजी वाढविली होती; पण ही काळजी लगेच दूर झाली. दुपारनंतर ऊन पडले. दिवसभरात सुमारे ३ हजार मोबाईल हँडसेट विक्री झाले. यात ८ हजार ते ५० हजार रुपयांच्या हँडसेटचा समावेश आहे. सुमारे २ कोटींची उलाढाल झल्याची माहिती ज्ञानेश्वर खेर्डे यांनी दिली. मागील नऊ दिवस कपडे खरेदीसाठी बाजारात गर्दी होती. शहरात सर्व व्यापारी क्षेत्र मिळून दिवसभरात ५०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज  प्रफुल मालानी यांनी वर्तविला.  

110 कोटींची वाहन  बाजारात उलाढालवाहनाच्या शोरूममध्ये ग्राहकांची वर्दळ होती. कार खरेदीसाठी सहपरिवार ग्राहक येत होते. असेच चित्र दुचाकीच्या शोरूममध्ये दिसले. मागील दोन दिवसांत शहरात ४५० कार तर  २ हजार दुचाकी विक्री झाल्या. वाहन बाजारात सुमारे ११० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती चेंबर ऑफ ऑथोराईज ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल पगारिया यांनी दिली. 

04 ते 05 कोटींची सराफा बाजारात उलाढालकोरोना काळानंतर रविवारी सराफा बाजारात तुरळक गर्दी दिसली. गेले सहा महिने सोन्याचे वाढलेले भाव पाहता सराफा बाजारात  ग्राहकीवर मोठा परिणाम झालेला दिसला. रविवारी सोने ५२८०० रुपये प्रति १० ग्रॅम होते. दिवसभरात ४ ते ५ कोटींची उलाढाल झाल्याची माहिती सराफा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिली. एकूणच बाजारात काहीसे नैराश्य होते.

25 ते 30 कोटींचे इलेक्ट्रॉनिक्सइलेक्ट्रॉनिक्समध्ये टीव्ही, फ्रीज, वाॅशिंग मशीनची विक्री मागील वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी राहिली; पण कोरोनाकाळ लक्षात घेता ग्राहकांचा अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद राहिला. इलेक्ट्रॉनिक्स बाजारात दिवसभरात २५ ते ३० कोटींदरम्यान उलाढाल राहिली, अशी माहिती  टीव्ही डीलर्स संघटनेचे अरुण जाधव यांनी दिली.

१५० फ्लॅट, रोहाऊसची विक्रीनव्या घरांचाही अनेकांनी घेतला ताबा गृहकर्जावरील कमी झालेले व्याजदर, मुद्रांक शुल्कात ३ टक्के सूट याचा फायदा घेण्यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर १५० फ्लॅट्स, रोहाऊस बुक झाले. तेवढेच लोक नवीन घरात राहायला गेले. १५० कोटींची उलाढाल या व्यवसायात झाली. बुकिंगमधून १५ कोटी रुपये आले, अशी माहिती क्रेडाईचे उपाध्यक्ष नितीन बागडिया यांनी दिली.       

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDasaraदसराbusinessव्यवसाय