शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणा खोऱ्याचे पाणी गोदावरी खो-यात वळविणार -कराड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 23:51 IST

वैतरणा खो-यामधून ११५ टी.एम.सी. पाणी गोदावरी खो-यामध्ये वळविण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.

औरंगाबाद : वैतरणा खो-यामधून ११५ टी.एम.सी. पाणी गोदावरी खो-यामध्ये वळविण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष उपसमितीची बैठक गुरुवारी पार पडली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला शंकरराव नागरे, ओमप्रकाश मोतीवाला, आनंतराव कराड, श्रीराम वरुडकर, बालाजी कोपलवार, ई.बी. जोगदंड, ओमप्रकाश वर्मा, जी. बी. ढाकणे, हर्षद शहा आदी तज्ज्ञ मान्यवर उपस्थित होते.डॉ. कराड म्हणाले की, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कृष्णा खोरे प्रकल्पातील २५ टी.एम.सी. पाणी मराठवाड्याला देण्याची मागणी करण्यात आली होती. याचा देखील पाठपुरावा करणार आहे. तसेच जायकवाडीतील पाणी शेतीला देण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मराठवाड्यातील वाहतूक व दळणवळणाची परिस्थिती सुधारण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत आणखी २० प्रकल्प घेण्याची त्यांना विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मराठवाड्यातील रस्ते, नॅशनल हायवे तसेच इतर कामांच्या प्रगतीचा आढावा देखील त्यांनी यावेळी घेतला.