शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वसमत बनतेय गुटखा विक्रीचा अड्डा

By admin | Updated: August 7, 2014 23:29 IST

वसमत : शासनाने गुटखा विक्री बंद केल्यापासून वसमतमध्ये गुटख्याला मोकळे रान मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

वसमत : शासनाने गुटखा विक्री बंद केल्यापासून वसमतमध्ये गुटख्याला मोकळे रान मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पूर्णा व परभणी येथील गुटख्याचे मुख्य सूत्रधार वसमत येथे मुख्य केंद्र स्थापन करून मराठवाडाभर गुटखा वितरण करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. वसमत येथे रेल्वे व ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून पोहोचत असून फेरीवाल्यांच्या माध्यमातून राजरोस गुटखा वितरित होत आहे.कधी काळी गुटख्यासाठी पूर्णा हे प्रसिद्ध झाले होते. आता सुरक्षेच्या दृष्टीने वसमतकडे मोर्चा वळविला आहे. वसमतच्या रेल्वेस्थानकावर हैदराबाद किंवा विदर्भ मार्ग गुटखा प्रचंड प्रमाणात उतरवला जात आहे. रेल्वेस्थानकापासून जवळच असलेल्या गढी मोहल्ला भागात गुटख्याचे मुख्य गोदामही उभे करण्यात आलेले आहे. रात्री-बेरात्री चारचाकी वाहनातून परभणी- पूर्णा भागातील युवकांच्या टोळ्या शहरात दाखल होत असून या टोळ्यांच्या देखरेखेखाली गुटखा गाडीत चढवणे व उतरवण्याचे काम होत असल्याचे वृत्त आहे. शहरात गुटखा वितरण करण्यासाठी किमान ५० फेरीवाले तैनात करण्यात आलेले आहेत. हे फेरीवाले भर बाजारपेठेत राजरोसपणे दुचाकीवरून गुटखा पानटपरी, किराणादुकान व जर्दा स्टोअर्सवर पोहोचवत असतात. ग्रामीण भागात मिनी टेम्पोद्वारे किंवा बंद बॉडीच्या मिनी टेम्पोद्वारे गुटखा पोहोचवला जात आहे.शहराच्या प्रत्येक पानटपरीवर गुटख्याच्या पुड्या लटकलेल्या पहावयास मिळतात. गुटाखा फेरीवाले तर पानटपरी वाल्यांना छापा पडणार नाही. वसमत येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी चार दिवसांपूर्वी हैदराबाद येथून ट्रकद्वारे आलेला गुटख्याचा मोठा साठा पकडला. ट्रान्सपोर्टद्वारे हैदराबाद येथून गुटखा ने-आण होत असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे. दोन महिन्यापुर्वी गढी मोहल्ला भागातील गुटख्याच्या गोदामावर पोलिसांनी छापा मारुन साठा जप्त केला होता. रेल्वे स्थानकावर उतरललेला गुटखाही रेल्वे पोलिसांनी वसमतहून जप्त करून नेला होता. पोलिस तपास योग्य दिशेने व योग्य ठिकाणापर्यंत पोहोचतो की नाही, हे पाहणे रंजक ठरणार आहे. तर मनुष्यबळ नसल्याचे नेहमीचेच कारण सांगत हातावर हात ठेवून बसणाऱ्या अन्न व औषधी भेसळ प्रतिबंधक विभागाकडेही लक्ष लागले