शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

घाटीत नातेवाईकांची ‘कसरत’

By admin | Updated: July 28, 2015 01:21 IST

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी एका विभागातून दुसऱ्या विभागात हलविण्याची जबाबदारी रुग्णांच्या नातेवाईकांनाच पार पाडावी लागत आहे.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी एका विभागातून दुसऱ्या विभागात हलविण्याची जबाबदारी रुग्णांच्या नातेवाईकांनाच पार पाडावी लागत आहे. कर्मचारी जागेवर राहात नसल्यामुळे धावपळ करून नातेवाईकांना रुग्णांना स्ट्रेचरवरून तपासणी करून इतर कामांसाठी न्यावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे काम थेट नातेवाईकांच्या खांद्यावर पडत असून, याकडे घाटी प्रशासनाचे मात्र, दुर्लक्ष होत आहे.घाटी रुग्णालयात संपूर्ण मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने गोरगरीब रुग्णभरती होतात. यातील अत्यवस्थ रुग्णांना स्टेचरवरून विविध विभागात हलवावे लागते. परंतु अपघात विभागात हे काम कर्मचाऱ्यांऐवजी रुग्णांच्या नातेवाईकांना स्वत: स्ट्रेचर ओढून घेऊन जावे लागत असल्याचे चित्र सर्रास दिसून येत आहे. याशिवाय उपचारासाठी तसेच विविध तपासण्यांसाठी रुग्णाला एका विभागातून दुसऱ्या विभागात नेण्याचे कामही नातेवाईकांनाच करावे लागत आहे.रुग्णांच्या सेवेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. परंतु कर्मचाऱ्यांचे संख्याबळ कमी असल्यामुळे रुग्णांना एका विभागातून दुसऱ्या विभागात हलविण्यासाठी तारेवरची कसरत करण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर येत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असून, कर्मचारी कमी असल्याचे कारण घाटी रुग्णालय प्रशासनाकडून दिले जात आहे. महिला, ज्येष्ठांची दमछाकरुग्णांस उपचारासाठी वेळेवर दाखल करण्यास नातेवाईक प्राधान्य देतात. त्यामुळे कोणतीही तक्रार न करता नातेवाईक स्वत: स्ट्रेचर ओढून नेतात. परंतु अनेकदा रुग्णांसोबत महिला, ज्येष्ठ नागरिक आलेले असतात. अशा वेळी स्ट्रेचर ओढून नेताना महिला आणि ज्येष्ठांची दमछाक होते. परंतु याकडे प्रशासनाचा कानाडोळा होत आहे.