शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वाशीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा

By admin | Updated: May 10, 2016 00:10 IST

वाशी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाच्या बळीराजा परिवर्तन विकास आघाडीचा पॅनलचा दारूण पराभव करीत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित

वाशी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाच्या बळीराजा परिवर्तन विकास आघाडीचा पॅनलचा दारूण पराभव करीत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शेतकरी विकास आघाडीने सर्वच्या सर्व १७ उमेदवार विजयी झाले़ तर एक उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निघाला आहे़ सहाय्यक निबंधक कार्यालयात सोमवारी सकाळी मतमोजणीनंतर निकाल लागताच काँग्रेस- राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह समर्थकांनी गुलालाची उधळण करीत मोठा जल्लोष केला़ भाजपा- शिवसेनेच्या पॅनलमधील एकही उमेदवार विजयी झाला नाही, हे विशेष!वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आ.राहूल मोटे व जि.प.सदस्य प्रशांत चेडे यांनी आघाडी केली होती. दोन्ही नेत्यांनी प्रथमत बाजार समितीची निवडणूक बिनविरोध काढण्याचा प्रयत्न केला़ मात्र त्यात त्यांना यश आले नाही. वाजवीपेक्षा जास्तीचा जागा शिवसेना-भाजपने मागितल्यामुळे निवडणूक लागली़ काँग्रेस पक्षाने ७ तर राष्ट्रवादी काँग्रेसने ११ जागा अशी विभागणी करून उमेदवार उभा केले होते़ यात सोसायटी मतदार (ओबीसी) संघातून दगडू पंडित यांची बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित १७ जागांसाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली होती.वाशी येथे सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात सोमवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी एम.एस.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणीस प्रारंभ झाला़ यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कुमार बारकुल यांची उपस्थिती होती़ हमाल मापाडी मतदार संघातून लक्ष्मण देवीदास घुले यांना १३ मते पडली तर त्यांची प्रतिस्पर्धी योगेश हरीदास कवडे यांना १२ मते मिळाली़ कवडे यांचा एक मताने पराभव झाला. व्यापारी मतदार संघातून विकास शिवाजीराव पवार यांना ३६, किरण नामदेव कागदे ३० मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी विकास सुंदर मोळवणे २३ व संजय प्रताप साळुंखे २१ मते पडली़ ग्रामपंचायत मतदार संघातून विकास जिवन आखाडे २३१, मनिष निळकंठ भराटे यांनी २३० मते मिळवून विजय मिळविला़ तर नितीन शिवाजी रणदिवे ९३, दिनकर शिंदे यांना केवळ ९५ मते मिळाली़ ग्रामपंचायत मतदार संघातून अ़जा़जमातीच्या मधून रामा यशवंत खंडागळे यांनी २३७ मते घेऊन विजय मिळविला़ त्यांनी अमोल सुरेश गाडे यांना धूळ चारली. इतर मागासवर्गीयामधून मायावती पांडुरंग घुले यांनी २३५ मते घेऊन विजय मिळविला़ तर त्यांचे प्रतिस्पर्धी संजय खवले यांना ९१ मते मिळाली. सोसायटी मतदार संघ (महिला) सुमित्रा ज्ञानोबा पाटील ३१२, मिना सुनिल सुकाळे ३१२ मते मिळवून विजयी झाल्या़ त्यांच्या प्रतिस्पर्धी सत्यभामा काशिनाथ गव्हाणे यांना ४७ तर मिनाबाई सुंदर माळी यांना ४५ मते मिळाली. भ.वि.जा.ज.मधून रत्नाकर नवनाथ मोराळे यांना ३१८ मते मिळाली त्यांनी राधेशाम बाबुदास बैरागी यांचा पराभव केला़ बैरागी यांना ४४ मतावर समाधाना मानावे लागले. इतर मागासवर्गियातून दगडू दादाराव पंडित यांची पूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. सोसायटीच्या सर्वसाधारण मतदार संघातून बिबिशन सुखदेव भराटे (३०४), प्रविण शिवाजी घोलप (२९३), सुनिल भिकाजी जाधवर (२८८), बिबिशन ज्ञानोबा खामकर (३०४), वसंत दादाराव मोरे (३०८), प्रकाश नामदेव मोेटे (३०४), रमेश उत्तमराव पाटील यांनी ३०५ अशी विक्रमी मते घेवून विरोधकांना धूळ चारली़ तर या मतदारसंघात महादेव बाबुराव चौधरी (५३), दिलीप कमलाकर गरड (४६), सचिन मच्छिंद्र इंगोले (४६), मच्छिंद्र पंढरी जाधवर (६२), रामहारी नामदेव मोटे (५५), पांडुरंग सयाजी उंदरे (३६) यांना पराभवाचा सामना करावा लागला़ (वार्ताहर) कार्यकर्त्यांनी केली गुलालाची उधळणनिकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला़ यावेळी आ. राहूल मोटे, जि.प.सदस्य प्रशांत चेडे, मजूर फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब चौधरी, रणजित मोटे, रा.कॉ.चे मच्छिंद्र कवडे, दिलीप घोलप, आबासाहेब सरवदे, रविकरण मोराळे, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष नितीन चेडे, काँग्रेसचे उपाध्यक्ष शामराव शिंदे, नगरपंचायतीचे गटनेते नागनाथ नाईकवाडी, प्रसाद जोशी, विठ्ठल कवडे, किरण जगताप, रमेश नन्नवरे, अ‍ॅड.सुर्यंकांत सांडसे, संतोष कवडे, विकासोचे चेअरमन छगनराव मोळवणे, नगरसेवक सचिन येताळ, मकरंद शिंगनापुरे, पांडरंग कवडे, काकासाहेब मोरे आदी उपस्थित होते. यावेळी पोनि महानोर व त्यांच्या सहाकऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.राजकीय चित्र बदलण्याची शक्यतावाशी तालुक्याच्या राजकारणात बाजार समितीची निवडणुक काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येवून लढविली आहे़ त्यामुळे विरोधी शिवसेना-भाजपाचा पूर्णत: धुव्वा उडाला आहे़ या निवडणुकीतील विजयाच्या गणितामुळे तालुक्याच्या राजकारणाचे चित्र बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे़