शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाचा वेग वाढणार; औरंगाबादेत आतापर्यंत ९२ हजार नागरिकांनी घेतली कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 19:40 IST

Corona vaccine कोरोनावरील प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्याने या लसीकरणावरही भर दिला जात आहे.

ठळक मुद्देमहिनाभरात दोन लाख नागरिकांना देणार लस १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांनाच ही लस दिली जाणार आहे.

औरंगाबादकोरोनाचा संसर्ग कमी व्हावा म्हणून काही दिवसांपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत शहरात ९२ हजार नागरिकांनी लस घेतली आहे. ८१ हजार नागरिकांनी पहिला, तर ११ हजार जणांना दुसरा डोस देण्यात आला. येत्या महिनाभरात आणखी २ लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट मनपाने निश्चित केले आहे. कोरोना संसर्गाने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगलेच हात-पाय पसरले आहेत. प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. मात्र, त्याचा काहीच फरक पडलेला नाही.

१ मार्च २०२१ पासून पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. शहरात दररोज १२०० पेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे मनपाने नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्यासोबतच यंदा कोरोनावरील प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्याने या लसीकरणावरही भर दिला जात आहे. शहरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना, त्यानंतर कोरोना काळात फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यापाठोपाठ १ मार्चपासून शहरात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वर्षे या वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांनाही लस देण्यास सुरुवात झाली आहे.

प्रत्येकाला कोरोना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. पहिला डोस घेतल्याच्या सहा आठवड्यांनंतर दुसरा डोस दिला जात आहे. अगदी सुरुतीला पहिला डोस घेतलेल्या अनेकांना आतापर्यंत दुसरा डोसही मिळाला आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांनाच ही लस दिली जाणार आहे. मनपा प्रशासनाने एप्रिलअखेर एकूण ३ लाख नागरिकांना डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. आतापर्यंत एकूण ९२ हजार लसींचा वापर झाला आहे. शहरातील ८१ हजार जणांना पहिला डोस मिळाला आहे. शिवाय यातील अकरा हजार जणांना दुसरा डोसही मिळाला असल्याचे मनपा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCorona vaccineकोरोनाची लस