औंढा नागनाथ : येथील ग्रामीण रूग्णालयास अत्यावश्यक रूग्णवाहिका मिळाली असून, तिचा लोकार्पण सोहळा शनिवारी दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने रूग्णांना तातडीची सेवा उपलब्ध व्हावी, म्हणून अत्यावश्यक रूग्णवाहिका देण्यात आली आहे. यासाठी रूग्णांना पुणे येथील टोल फ्री क्रमांक १०८ वरून या रूग्णवाहिकेचा उपयोग घेता येणार आहे. यासाठी या रूग्णवाहिकेमध्ये डॉ.अभय देशपांडे व डॉ. ढेंबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही सेवा २४ तास उपलब्ध राहणार आहे. यासाठी तीन चालकांची ंदेखील १२-१२ तासांसाठी ड्युटी लावण्यात आली आहे. अशा या बहुउपयोगी रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी सरपंच वसंत मुळे, उपसरपंच माणिक पाटील, पं.स. उपसभापती अनिल देशमुख, जी.डी.मुळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिष दरडे, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते ब.ल.तामसकर, जकी काझी, पुरूषोत्तम देव, सुरजितसिंह ठाकूर, डॉ.अभय देशपांडे, गजानन देशपांडे यांची उपस्थिती होती. (वार्ताहर) दाम्पत्याकडून दीड लाखांचा औषधसाठा औंढा नागनाथ येथील ग्रामीण रूग्णालयास मुंबई येथील सेवानिवृत्त दाम्पत्याने दीड लाख रुपये किमतीची औषधी शुक्रवारी सकाळी दान दिली आहे. मुंबई येथील सेवानिवृत्त सुरेंद्र तोगरे व त्यांच्या पत्नीने रूग्णांना लागणारे औषध,गोळ्या, टॉनिकच्या बाटल्या, सलाईनसह अत्यावश्यक औषध दान दिली आहे. हे दाम्पत्य दरवर्षी सात ते आठ रूग्णालयांना औषध दान करतात. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिष दराडे यांची उपस्थिती होती.
औंढ्यात रूग्णवाहिकेचे लोकार्पण
By admin | Updated: May 11, 2014 00:37 IST