शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत ‘उत्कर्ष’ने पुन्हा मारली बाजी, विकास मंचचा धुव्वा

By योगेश पायघन | Updated: November 30, 2022 18:59 IST

१० पैकी ९ जागांवर ‘उत्कर्ष’चा विजय, सलग ४५ तास चालली मतमोजणी

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधर गटातील निवडणुकीची मतमोजणी तब्बल ४५ तासांनी पुर्ण झाली.सोमवारी सकाळी १० वाजता सुरू झालेली मोजणी बुधवारी सकाळी ७ वाजता संपली. पदविधर गटातील १० पैकी तब्बल ९ जागांवर मोठ्या फरकाने उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांनी बाजी मारत विद्यापीठ विकास मंचचा धुव्वा उडविला. बुधवारी पहाटे उत्कर्षचे भारत खैरनार, हरिदास सोमवंशी, तर विद्यापीठ विकास मंचच्या योगिता होके पाटील या एकमेव उमेदवार विजयी झाल्या.

पदवीधर गटातील सर्व दहाही जागांचे निकाल बुधवारी सकाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने जाहीर झाले. विजयी उमेदवारांचे निकाल कुलसचिव डाॅ. भगवान साखळे यांनी जाहीर केले. तर विजयी उमेदवारांना कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले. प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. साखळे यांच्यासह निवडणुक समिती, तज्ज्ञ, अधिष्ठातांची उपस्थितीत मतमोजणीसाठी प्रत्येक शिफ्टला ४० प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी असे एकूण १२० जणांनी हि प्रक्रीया पार पाडली.

सतीश चव्हाणांची खेळी यशस्वीपहिल्या टप्प्यात राखीव गटातून उत्कर्षचे सुनील मगरे, सुनील निकम, राऊत किशनराव, पूनम पाटील व दत्तात्रय भांगे हे मोठ्या फरकाने निवडून आले. तर खुल्या प्रवर्गातील ४ जागांवर उत्कर्षचे उमेदवार विजयी झाल्याने पदवीधर मतदार संघात आ. सतीश चव्हाण यांनी पुन्हा निर्वीवाद वर्चस्व सिद्ध केले. विद्यापीठ विकास मंचच्या एकमेव विजयी जागेसाठी उत्कर्षच्या गोटातूनच मदत झाल्याची चर्चा मंचच्या गोटातून सुरू होती. त्यामुळे योगिता होके पाटील यांचा विजय निश्चित मानला जात होता.

दोघांनी कोटा ओलांडला, तिघे काठावरच पासखुल्या गटासाठी झालेल्या १८ हजार ४०० मतातून १६ हजार ४७२ मते वैध तर १,९६८ मते अवैध ठरली. पहिल्या पसंतीच्या फेरीत एकही उमेदवार २ हजार ७४६ हा विजयासाठीचा आवश्यक कोटा पूर्ण करु शकले नाहीत. डॉ. नरेंद्र काळे हे बाराव्या तर जहुर शेख हे १८ व्या फेरीत कोटा पूर्ण करुन विजयी झाले. भारत खैरनार २६७६, योगिता होके पाटील २१७३ व हरिदास सोमवंशी हे १७२७ मते घेऊन विजय ठरले. हे तीनही उमेदवार कोटा पूर्ण करु शकले नाहीत. मतमोजणीच्या २४ व्या फेरीनंतर पहिल्या उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले.

पहिल्या फेरीत हजाराच्या आतसंभाजी भोसले ९५७, रमेश भूतेकर ८९०, लक्ष्मण नवले ७१९, विजय पवार ७२१, अशिष नावंदर ४६५, तुकाराम सराफ ४४८ , प्रकाश इंगळे ४०१, चंद्रकांत चव्हाण ३५६, अमर कदम २३६, पंकज बनसोडे २८७, सुनील जाधव २०१, सुनील गावीत १२६, भागवत निकम ११८, पंडित तुपे १०२, परमेश्वर वाघमारे ९९, हनुमंत गुट्टे ९४, अमोल शिंगटे ८५, पकंज बनसोडे २२७ , सुनील काळे ३७, सतीश धुपे ३१, सुचिता इंगळे २९, नितीन फंदे २१, अनिल तडवी १५, विलास सरकटे ९ अशा एकुण २५ उमेदवारांना हजार मतेही पहिल्या फेरीत मिळवता आले नाही.

मतदार नोंदणी ते निकाल या सर्व टप्प्यांवर कर्मचारी, प्राध्यापक, उमेदवार, प्रशासन, पोलीसांच्या सहकार्यामुळे पारदर्शक व निर्विवादपणे शांततेत मतदान, मतमोजणी पार पडली. दुसऱ्या टप्प्यातही ही प्रक्रिया अशाच पद्धतीने पार पाडू. मतदानाचे प्रमाण वाढवणे व बाद मतांचे प्रमाण घटवणे आव्हान असेल.-डॉ.प्रमोद येवले, कुलगुरु, डाॅ. बा. आं. म. वि. औरंगाबाद

२ दोन दशकांपासून विद्यापीठाच्या शैक्षणिक, भौतिक विकासात विद्यापीठ उत्कर्ष पॅनलने नेहमीच पुढाकार घेतला. याचीच पावती म्हणून सुजान मतदारांनी दिली.अधिसभेच्या १० पैकी ९ जागांवर विद्यापीठ उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांना विजयी केले. उत्कर्ष पॅनल यापुढेही विकासासाठी प्रभावीपणे कार्य करेल. मतदारांचे आभार.-आ. सतीश चव्हाण, उत्कर्ष पॅनलचे प्रमुख

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक