शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उद्यमनगरीतील ग्रीनबेल्ट उजाड करून पार्किंगसाठी वापर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 18:30 IST

औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण रोखण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाने परिसर हिरवागार करण्यात आला होता. देखभाल व विकसित करण्यासाठी ग्रीनबेल्ट दिले असले तरी सर्रास वृक्षतोड करून पार्किंगसाठी त्या जागा उपयोगात आणल्या जात आहेत.

वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण रोखण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाने परिसर हिरवागार करण्यात आला होता. देखभाल व विकसित करण्यासाठी ग्रीनबेल्ट दिले असले तरी सर्रास वृक्षतोड करून पार्किंगसाठी त्या जागा उपयोगात आणल्या जात आहेत. त्यामुळे एमआयडीसीने मूळ उद्देशापासून लक्ष विचलित केले काय, असा प्रश्न निसर्गप्रेमींना पडला आहे.

झाडांना तारेचे संरक्षक कुंपण लावून सुरक्षारक्षकदेखील तैनात असताना  औद्योगिक क्षेत्रातील रस्ते उजाड होत आहेत. ग्रीनबेल्टमध्ये अनेकांनी किरकोळ स्वरूपाचे व्यवसाय मांडले, तर अनेकांनी त्याचा आपापल्या सोयीनुसार उपयोग घेणे सुरू केले आहे. या प्रकाराकडे एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. तिरंगा चौकापासून ते बजाजनगर, साजापूर, रांजणगाव, जोगेश्वरी, वाळूज, कमळापूर, इटावा, घाणेगाव इत्यादी परिसरातील विविध सेक्टरमधील झाडांची संख्या अधिक असल्याने पर्यावरणातील संतुलन राखणे सोयीचे ठरत होते; परंतु औद्योगिक क्षेत्रातील  झाडावर ‘कु-हाड’ चालवून परिसर भकास केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तारेचे कुंपण तोडून त्या ठिकाणी अघोषित पार्किंग तयार करण्यात आलेली आहे.

एमआयडीसी परिसरातून अधिकारी, कर्मचारी सर्रास फेरफटका मारतात; परंतु झाडांची कत्तल त्यांच्या दृष्टीस पटत नसल्याचे दिसते. एमआयडीसीने बहुतांश कारखान्यांना त्यांच्या समोरील ग्रीनबेल्टचा परिसर विकसित करण्यासाठी व देखभालीसाठी दिलेला आहे. बहुतांश कंपन्यानी ग्रीनबेल्ट कायम ठेवण्यापेक्षा त्याचा वाहन पार्किंगसाठीच वापर केला आहे. मूळ उद्देशापासून लक्ष विचलित करण्याचा प्रकार या परिसरात पाहण्यास मिळत आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा प्रचार शासनस्तरावर होत आहे, ही घोषणा कागदोपत्रीच राहते की काय, असा सवाल केला जात आहे. तिरंगा चौक ते साजारपूरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा झाडांची संख्याच घटली आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे दीपक पाडळकर म्हणाले. ग्रीनबेल्ट ज्या उद्देशाने कारखानदाराला विकसित करण्यासाठी दिलेले आहेत त्यांनी दुर्लक्ष केले असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विठ्ठल कांबळे यांनी केली आहे.

चौकशी करून कारवाई करणारऔद्योगिक क्षेत्रातील झाडांची कटाई होऊ नये, तसेच ज्या कारखान्याला परिसर विकसित करण्यासाठी दिलेला आहे त्यांनी लक्ष दिले नाही आणि त्या ग्रीनबेल्टचा दुरुपयोग होत असेल तर त्याची चौकशी करून कारवाईदेखील करण्यात येईल, असे सहायक अभियंता डी.एस. परळीकर म्हणाले.

टॅग्स :WalujवाळूजMIDCएमआयडीसीpollutionप्रदूषणAurangabadऔरंगाबाद