शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
3
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
4
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
5
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
6
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
7
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
8
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
9
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
10
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
11
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
12
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
13
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
14
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
15
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
16
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
17
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
18
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
19
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
20
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!

हेल्मेटचा वापर वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2016 00:15 IST

औरंगाबाद : विना हेल्मेट दुचाकी चालविताना अपघात झाल्यास गंभीर दुखापत होऊन मृत्यूचा धोका अधिक असतो.

औरंगाबाद : विना हेल्मेट दुचाकी चालविताना अपघात झाल्यास गंभीर दुखापत होऊन मृत्यूचा धोका अधिक असतो. ही बाब लोकमतने सुरू केलेल्या ‘दोस्ती हेल्मेटशी दोस्ती’ या वृत्तमालिकेतून नियमाने वाचकांपर्र्यंत पोहोचविण्यात येत आहे. हेल्मेटसंदर्भात आलेले बरे-वाईट अनुभवही सामान्य नागरिक लोकमतच्या माध्यमातून वाचकांना सांगत आहेत. शिवाय वाहतूक पोलिसांकडूनही हेल्मेटसंदर्भात जनजागरण करण्यात येत असल्याने त्याचा चांगला परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील दुचाकीचालकांकडून हेल्मेटचा वापर वाढल्याचे दिसत आहे.विना हेल्मेट दुचाकी चालविताना अपघात घडल्यास मेंदूला गंभीर मार लागून गतवर्षी सुमारे १०२ जणांना प्राणास मुकावे लागले. तसेच त्याहून किती तरी पट लोकांना कित्येक दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. अशा प्रकारच्या घटनांमध्ये मरण पावलेल्या अथवा जखमी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यालाही गंभीर परिणाम भोगावे लागतात. दुचाकी अपघातामधील मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेट हा एक उत्तम उपाय आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी हेल्मेट वापरण्यासंदर्भात जनजागरण सुरू केले आहे. लोकमतने ‘दोस्ती हेल्मेटशी दोस्ती’ ही वृत्त मालिका सुरू केली. या वृत्त मालिकेच्या माध्यमातून हेल्मेटचे महत्त्व सामान्य वाचकांपर्यंत पोहोचत आहे. त्याची गंभीर दखल दुचाकीचालक वाचक घेत आहेत. त्यांच्याकडून आता हेल्मेटचा वापर वाढल्याचे दिसत आहे. महिनाभरापूर्वी रस्त्यावर अपवादाने दिसणाऱ्या हेल्मेटधारी दुचाकीस्वारांची संख्या आता झपाट्याने वाढत असल्याचे दिसते. पोलिसांची हेल्मेट रॅली पाहिली अन्..मी आजपर्यंत दुचाकी चालविताना कधीच हेल्मेट वापरलेले नाही; परंतु वाहतूक सुरक्षा पंधरवडा असल्याने ५ जानेवारी रोजी पोलिसांनी काढलेली हेल्मेट दुचाकी रॅली पाहिली आणि मनातल्या मनात स्वत:बद्दलच लाज वाटायला लागली. हेल्मेट वापरण्यासंदर्भात पोलिसांकडून किती मूलभूत बाब सांगितली जात आहे! आपण एवढे दिवस ही बाब समजू शकलो नाही. मात्र, पोलिसांची हेल्मेट रॅली पाहिल्यापासून हेल्मेटशिवाय दुचाकीवर बसायचे नाही, हा संकल्प केला आणि हेल्मेट घालूनच दुचाकी प्रवास सुरू केला. हेल्मेटने केवळ तुमच्याच डोक्याचेच नव्हे तर तुमच्या आयुष्याचे रक्षण होते. त्यामुळे हेल्मेटचे केवळ फायदेच आहेत... -ऋतिक मैड,विद्यार्थी विवेकानंद महाविद्यालय तुमचे अनुभव पाठवा...हेल्मेट ही त्रासदायक वस्तू नसून, त्याच्या वापरामुळे जिवावर बेतलेले संकट टळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दुचाकी अपघातात हेल्मेटमुळे तुमचे अथवा कुटुंबातील सदस्याचे प्राण वाचले असल्यास आम्हाला तुमचे अनुभव कळवावेत. आपले अनुभव लोकमत कार्यालयात लेखी स्वरूपात आणून द्यावेत अथवा व्हॉटस् अ‍ॅप क्र मांक 9765353544 किंवा 9172515115 या क्रमांकावर पाठवावेत.