शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक ! कोरोनाबाधितांच्या उपचारात 8137 रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 19:28 IST

वापरलेल्या इंजेक्शनचा रुग्णाला फायदा झाला असून इंजेक्शन दिलेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

ठळक मुद्देडब्ल्यूएचओ म्हणते त्याचा प्रभाव दिसला नाही   तज्ज्ञ म्हणतात कोरोनामध्ये ठरतेय प्रभावी

औरंगाबाद :  कोरोनावर प्रभावी इंजेक्शन म्हणून वापरल्या गेलेल्या रेमडेसिवीरच्या आतापर्यंत जिल्ह्यात ८१३७ कुप्प्यांची विक्री झाली. सुमारे साडेतील कोटींच्या इंजेक्शनचा वापर १३५७ बाधितांच्या उपचारात केला गेला.  हे इंजेक्शन बाधितांच्या उपचारात प्रभावी ठरत असल्याचा दावा तज्ज्ञ आजही करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने मात्र रेमडेसिवीर इंजेक्शनचे विशेष परिणाम किंवा त्यामुळे मृत्यू टाळता येतो, असेही दिसून आले नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे या इंजेक्शनच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जगात कोरोनाची माहामारी सुरू होऊन वर्ष सरले. काही देशांत दुसरी लाट सुरू झाली. भारतातही कोरोनाचा कहर पुन्हा वाढतो आहे.  कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात रेमडेसिवीरला खूप प्रभावी मानल्या गेले. एका रुग्णाला हे सहा इंजेक्शन द्यावे लागतात. एका कुपीसाठी ५ ते १० हजारांची किंमत बाधितांच्या नातेवाईकांनी मोजली. बाधितांकडूनही रेमडेसिवीरचा हट्ट धरल्या गेला. सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या खूप वाढली. त्यावेळी शहरात दररोज चारशे ते पाचशे इंजेक्शनची मागणी होती. तुटवड्याच्या परिस्थितीत अन्न औषध प्रशासनाने यावर नियंत्रण ठेवून आवश्यक इंजेक्शनची उपलब्धता करून दिली. सध्या रुग्णसंख्या घटलेली आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत ८६३८ इंजेक्शन जिल्ह्यात उपलब्ध झाले. आतापर्यंत ८१३७ इंजेक्शन वापरल्या गेले असून ४६५ शिल्लक असल्याचे औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे यांनी सांगितले.

स्थानिक तज्ज्ञ म्हणतात, बाधित रुग्णांना फायदाशासनाकडून रेमडेसिवीर वापरू नका अशा सूचना नाहीत. मात्र, रेमडेसिवीर उपयोगी ठरत असल्याचे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. नीता पाडळकर यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी म्हणाले, ४१५० पैकी सध्या २७०८ इंजेक्शन शिल्लक आहेत. वापरलेल्या इंजेक्शनचा रुग्णाला फायदा झाला असून इंजेक्शन दिलेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. घाटीत उपलब्ध केलेल्या ४ हजारपैकी ३ हजार ४०० इंजेक्शनचा वापर झाला असून ६०० औषध भंडारात शिल्लक आहेत. घाटीत कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन प्रभावी ठरले आहे, असे मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद