शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक

By सुमेध उघडे | Updated: April 22, 2025 15:35 IST

UPSC Result 2025: “निराश न होता सातत्य ठेवणं आणि प्रत्येक चुकांमधून शिकत पुढे जाणं हेच यशाचं गमक आहे.”, तेजस्वीचा मोलाचा सल्ला

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) निकालात छत्रपती संभाजीनगरच्या तेजस्वी देशपांडे हिने उल्लेखनीय यश संपादन करत देशभरात ९९ वा क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण शहरात आनंदाचं वातावरण असून नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि नागरिक तिचं अभिनंदन करण्यासाठी तिच्या घरी गर्दी करत आहेत.

तेजस्वी हिने आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण नाथ व्हॅली स्कूलमध्ये पूर्ण केलं. पुढील शिक्षणासाठी ती दिल्लीला गेली आणि तिने लेडी श्रीराम कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवली. शिक्षण घेत असतानाच तिच्या मनात यूपीएससीची तयारी करण्याची ठाम इच्छा निर्माण झाली आणि तिने दिल्लीमध्येच राहून अभ्यास सुरू केला.

डॉक्टर घराण्यातून तेजस्वीला बाळकडूतेजस्वीचे वडील डॉ. प्रसाद देशपांडे हे घाटी रुग्णालयाच्या मनोविकार विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत, तर तिची आई डॉ. गौरी देशपांडे या दंतचिकित्सक आहेत. त्यामुळे घरात अभ्यास आणि सेवाभावाचे वातावरण लाभले, ज्याचा तिला खूप फायदा झाला.

चिकाटी आणि नियोजनबद्ध अभ्यासाने यशतेजस्वीचा यूपीएससीमधील हा तिसरा प्रयत्न होता. पहिल्या दोन वेळा प्रीलिम्समध्ये यश मिळाले नव्हते, मात्र अपयशाने खचून न जाता तिने आपला अभ्यास अधिक नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध केला. सतत सराव, वेळेचं व्यवस्थापन आणि प्रत्येक विषयावर सखोल लक्ष देत तिने अंतिम यश प्राप्त केलं. UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ती सांगते की, “निराश न होता सातत्य ठेवणं आणि प्रत्येक चुकांमधून शिकत पुढे जाणं हेच यशाचं गमक आहे.”

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर