शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

टाकावू वाणाच्या सामानावर होतोय अनाठायी खर्च

By admin | Updated: January 14, 2016 23:13 IST

वसमत : संक्रांतीनिमित्त वाणाचे सामान खरेदी करण्यासाठी बाजारात महिलांची गर्दी होत आहे. त्याची दुकानेही मोठ्या संख्येने थाटलेली आहेत

वसमत : संक्रांतीनिमित्त वाणाचे सामान खरेदी करण्यासाठी बाजारात महिलांची गर्दी होत आहे. त्याची दुकानेही मोठ्या संख्येने थाटलेली आहेत. मात्र बहुतेक साहित्य हे कोणत्याही उपयोगाचे नाहीत. तरीही महिला एकमेंकींना वाण देण्यासाठी पैसे मोजून या टाकावू वस्तू खरेदी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.मकरसंक्रांत हा महिलांचा महत्त्वाचा सण आहे. यामध्ये महिलांचे एकमेकींना वाण देण्याचा कार्यक्रम घरोघर होते. त्यानिमित्ताने महिलांच्या गाठी-भेटी व मैत्री वृद्धिंगत होत असते. मात्र वाण देताना ज्या वस्तू वापरल्या जातात त्या बहुतेक टाकाऊ दर्जाच्याच असतात. ज्यांना हे वाण म्हणून दिले जाते त्यांच्याही उपयोगाची ती वस्तू ठरत नाही. वाण देणाऱ्या महिलांनी मात्र पैसे मोजून ती वस्तू खरेदी केलेली असते. असा हा दोन्ही बाजूंनी नुकसानीचा व व्यापाऱ्यांना मात्र प्रचंड फायद्याचा प्रकार आहे. प्रत्येक घरी किमान २०० ते ३०० महिलांना वाण दिले जाते. स्वत:चे वाण वाटावे, अशी बाजारातून पाच ते दहा रुपयांपर्यंतची वस्तू शोधली जाते. यात मग लहान-लहान वाट्या, ग्लास, प्लास्टिकचे चमचे, डब्बे, टोपल्या, आरती, पेन, कांड्या आदी वस्तूंचाच भरणा असतो. यापैकी एकही वस्तू घरी वापरता येत नाही. त्यांचा कचराच होतो, हे उघड चित्र असतानाही वाणासाठी किमान प्रत्येक घरी ५०० ते हजार रुपयांचा खर्च होतो. वाण वाटणाऱ्या व घेणाऱ्या महिलांची संख्या याचा हिशेब लावला तर होणारा खर्च डोळे फिरवणारा ठरत आहे. मात्र या बाबीकडे अद्याप कोणी गांभीर्याने पाहिलेले नाही. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता अशा टाकाऊ वाणाच्या साहित्यावर खर्च करण्याऐवजी काही तरी दैनंदिन गरजेच्या वस्तूचा वापर व्हावा, अन्यथा तसे साहित्य घेवू नये व देवूही नये, असा विचार समोर येणे गरजेचे आहे. महिला मंडळांनी वाण देण्याघेण्याच्या कार्यक्रमाद्वारे अशा व्यर्थ खर्चास फाटा देण्याबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. वर्षभर जे साहित्य गोदामात पडून आहे, ते वाणाचे साहित्य म्हणून विकण्यासाठी विक्रेत्यांनी बाहेर काढल्याचे सध्याचे चित्र आहे.स्वस्त म्हणून गंज लागलेली भांडीही विक्री होताना दिसत आहेत. प्लास्टिकच्या वस्तू तर एवढ्या तकलादू असतात की अनेकदा घरी जाईपर्यंतही तडकतात. अशा टाकावू वस्तूंवर व्यर्थ का केला जातो हे मात्र कोडेच आहे. या पैशांतून एखादे सामूहिक विधायक कार्याचे उभे राहिले तर ते खऱ्या अर्थाने सामाजिक ऋण फेडण्याचे वाण ठरू शकते. या दृष्टिने महिलांनी विचार करून खऱ्या अर्थाने टाकावू वाणावरच संक्रांत आणण्याची गरज आहे. (वार्ताहर)