शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अपात्र लागले नोकरीला; ‘स्टाफ नर्स’पाठोपाठ तांत्रिक, अतांत्रिक पदभरतीतही घोटाळा

By संतोष हिरेमठ | Updated: June 14, 2025 20:19 IST

अपात्र झाले पात्र, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण सहायक, ईसीजी तंत्रज्ञ म्हणून नोकरी

छत्रपती संभाजीनगर : ‘स्टाफ नर्स’ नियुक्तीपत्र घोटाळ्यापाठोपाठ वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागातर्फे २०२३ मध्ये राबविण्यात आलेल्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदभरतीतही घोटाळा झाला आहे. अपात्र असलेले अनेक उमेदवार प्रयोगशाळा सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण सहायक, ईसीजी तंत्रज्ञ आदी पदांवर रुजू झाले. माहिती अधिकारातून मिळविलेल्या माहितीतून ही बाब समोर आल्याचे परीक्षार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

‘सरकारी स्टाफ नर्ससाठी नियुक्तीचा दर २० लाख’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने २ जून रोजी वृत्त प्रकाशित करत स्टाफ नर्स नियुक्तीपत्र घोटाळा समोर आणला. या वृत्तानंतर तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी ‘लोकमत’शी संपर्क साधला. तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदभरतीतही अपात्रांना नियुक्ती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

माहिती अधिकारातून काय आले समोर?एक उमेदवार २०२० मध्ये बारावी उत्तीर्ण झाला. त्यानंतर चार वर्षांच्या ‘बीपीएमटी’ अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. ऑक्टोबर २०२४ मध्ये पदवी प्राप्त केली. परंतु वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या १० मे २०२३ रोजी पदभरतीच्या जाहिरातीनुसार २५ मे २०२३ पर्यंत शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे गरजेचे होते. त्यानुसार उमेदवाराला अपात्र ठरवणे गरजेचे होते. परंतु त्याला पात्र ठरविण्यात आले आणि नियुक्तीही देण्यात आली. अशाचप्रकारे इतर अपात्र उमेदवारांना नियुक्ती दिल्याचे समजते.

अपात्र उमेदवारांना नोकरीमी माहिती अधिकाराद्वारे माहिती मिळवली आहे. त्यातून शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्यापूर्वीच उमेदवाराला पात्र ठरविण्यात आले. यासारखे २५ ते ३० जण वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात प्रयोगशाळा सहायक, ईसीजी तंत्रज्ञ, एक्स-रे सहायक आदी पदांवर कार्यरत आहेत. या भरतीतही मोठा गैरप्रकार झालेला आहे.-हनुमान खेत्रे, परीक्षार्थी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfraudधोकेबाजी