शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बीड बायपासवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 01:25 IST

बीड बायपासवर एक महिन्यात पाच जणांचे बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून सकाळी आणि सायंकाळी जडवाहनांना प्रवेशबंदी करण्याचा प्रयोग पहिल्याच दिवशी फसला. वाहतूक पोलिसांनी जडवाहतूक रोखल्याने दोन्ही बाजूंनी बीड बायपासवर मालवाहू ट्रक, हायवासह अन्य जडवाहनांच्या सात ते आठ किलो मिटरपर्यंत रांगा लागल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बीड बायपासवर एक महिन्यात पाच जणांचे बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून सकाळी आणि सायंकाळी जडवाहनांना प्रवेशबंदी करण्याचा प्रयोग पहिल्याच दिवशी फसला. वाहतूक पोलिसांनी जडवाहतूक रोखल्याने दोन्ही बाजूंनी बीड बायपासवर मालवाहू ट्रक, हायवासह अन्य जडवाहनांच्या सात ते आठ किलो मिटरपर्यंत रांगा लागल्या.शहराची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडवर सकाळी ७ ते रात्री ११ या कालावधीत जडवाहनांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. यामुळे जडवाहने कालपर्यंत बीड बायपास रस्त्याचा वापर करीत होते. बीड बायपासवर महिनाभरात पाच जणांचे अपघातात बळी गेले. सततच्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी बायपासवरील जडवाहनांना सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या कालावधीत प्रवेशबंदी करण्याचा ़निर्णय कालच पोलीस आयुक्तांनी घेतला. प्रायोगिक तत्त्वावर ९ सप्टेंबरपर्यंत हा आदेश पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जारी केली. जडवाहनांना सकाळी आणि सायंकाळी प्रवेशबंदी करण्याच्या निर्णयाचा रविवारी पहिला दिवस होता. पोलीस आयुक्तांच्या अधिसूचनेत जालना, बीडकडून येणा-या जडवाहनांना पाचोड-पैठण लिंकरोड किंवा केम्ब्रिज चौक-सावंगी बायपास- फुलंब्री-खुलताबाद-कसाबखेडा या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले. नाशिक आणि धुळ्याकडे येणा-या-जाणा-या जडवाहनांना पैठण लिंकरोड, पाचोड मार्गाचा पर्याय सुचविण्यात आला. एक तर तीन तास एकाच ठिकाणी उभे राहणे; अथवा सुमारे चाळीस ते पन्नास कि.मी. लांबीच्या पर्यायी मार्गाचा वापर करणे, असे दोन पर्याय ट्रक, हायवाचालकासमोर होते. यामुळे दुस-या पर्यायाचा वापर केल्यास अतिरिक्त इंधन खर्च होऊन ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. यामुळे जडवाहनचालकांनी रविवारी सकाळी आणि सायंकाळी त्यांचे वाहन आहे तेथे उभे केले. परिणामी, सकाळी ८ ते ११ या वेळेत एकही जडवाहन बीड बायपासने मार्गक्रमण करू शकले नाही. सकाळी ८ ते रात्री ११ या कालावधीत बीड बायपास ते केम्ब्रिज चौकाच्या पुढे आणि बीड रोडवर सुमारे दोन ते अडीच हजार ट्रक, हायवांच्या रांगा लागल्या. तसेच लिंक रोड ते पैठण रोड आणि ए.एस. क्लबच्या पुढे चार ते पाच किमी वाहने उभी होती.स्पीड गण गायब,वेगावर नियंत्रण नाहीबीड बायपास रस्त्यावरील अपघातांमध्ये बºयाचदा वाहनांचा वेग कारणीभूत असल्याचे समोर आले. सुसाट वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बायपासवर स्पीड गण बसविले होते. मात्र, वर्षभरात स्पीड गण नादुरुस्त झाल्याने बायपासवरून ही यंत्रणा गायब झाली. शिवाय आजपर्यंतच्या अपघातांना वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे हे महत्त्वाचे कारण असल्याचे अधिका-यांनी नमूद केले.सर्व्हिस रोड बांधणे गरजेचेबीड बायपास रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नागरी वसाहती अस्तित्वात आल्या. या वसाहतींमुळे बायपास आता शहरातील मार्ग झाला. या मार्गाला सर्व्हिस रोडची आवश्यकता आहे. सर्व्हिस रस्ता बांधल्यास या मार्गावरील अपघात रोखण्यास मदत हाईल, असे वारंवार सांगितले जाते. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी बायपासवरील सर्व्हिस रोड होत नाही.केवळ एकच लेन वाहतुकीसाठी मोकळीवाहनचालकांना बायपासवरील जडवाहनांना प्रवेशबंदीची माहिती नव्हती. यामुळे नेहमीप्रमाणे बायपासने निघालेल्या जडवाहनांना अचानक आहे तेथे थांबण्यास सांगितल्याने बायपासवरील एक लेन जडवाहनांनी व्यापली होती. परिणामी, एकच लेन वाहतुकीसाठी मोकळी होती.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक