शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पालिका सभेत अभूतपूर्व गोंधळ

By admin | Updated: February 28, 2017 00:56 IST

जालना : पाणीटंचाई, बांधकाम परवाने, रस्त्यांची एनओसी, स्वच्छता आदी विविध मुद्यांवरून सोमवारी झालेली जालना नगर परिषदेची सभा चांगलीच गाजली.

जालना : पाणीटंचाई, बांधकाम परवाने, रस्त्यांची एनओसी, स्वच्छता आदी विविध मुद्यांवरून सोमवारी झालेली जालना नगर परिषदेची सभा चांगलीच गाजली. गदारोळातच ३३ विषयांना मंजुरी देण्यात आली. मंजूर विषयांचा विरोधीपक्ष सदस्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. एकूणच दमदाटी, आरेरावी आणि शिवराळ भाषेमुळे सभागृह काही वेळ स्तब्ध झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सोमवारी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल उपस्थित होत्या. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर उपस्थित होते. प्रारंभीच राष्ट्रवादीचे नगरगसेवक शाहआलम खान यांनी जुना जालन्यात २५ दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. याबाबत पालिकेची काय उपाययोजना आहे. याचा मुख्याधिकाऱ्यांकडे खुलासा मागतिला. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे सांगून त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. रेणुका पाटील-निकम यांनीही याच मुद्यावरून पालिकेने काय पर्यायी योजना केली याचा जाब विचारला.गांधी चमन ते मोतीबाग हा मार्ग चांगला असतानाही तो खोदल्याबद्दल अनेक नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सहा वर्षांपूर्वी जे रस्ते झाले आहेत. अशाच कामांना एनओसी देण्यात यावी, असे शासनाचे आदेश होते. ते धाब्यावर बसविण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. पाणी पुरवठ्याच्या प्रश्नांवरून स्वीकृत सदस्य बाला परेदशी यांनी तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांच्या काळात शहराला चार दिवसांतून एकदा पाणी मिळत होते. सध्या तर १५ दिवस पाणीपुरवठा केला नसल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप केला. त्यावर महावीर ढक्का यांच्यासह काँग्रेसच्या नगरसेवकांनी चार दिवसांआड कधीही पाणी मिळत नव्हते असे सांगत सद्यस्थितीत शहरातील विविध भागांतील जीर्ण झालेली जलवाहिनी आणि जायकवाडी धरणाजवळील व्हॉल्व हवेच्या दाबामुळे फुटल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे सांगितले. जायकवाडी ते जालना जलवाहिनी व्हॉल्व्ह दुरूस्तीचे काम सुरू असून पाणीपुरवठा लवकरच सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरु झाल्यानंतर निश्चितपणे पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वीकृत सदस्य विजय चौधरी यांनी एका रस्त्याची दोनद निविदा काढून बिल उचलण्यात आल्याचे पुराव्यानिशी सादर केले. सदर प्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी खांडेकर यांनी दिले. शिवसेना गटनेते विष्णू पाचफुले यांनी बांधकाम परवाना मुद्द्यावरुन मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरत तात्काळ परवाने देण्याची मागणी केली. विरोधी पक्षाचे भास्कर दानवे, लक्ष्मीकांत पांगारकर, शशिकांत घुगे, विशाल बनकर व अन्य नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत प्रत्येक विषयाची चर्चा झाल्यानंतरच विषयांना मंजुरी देण्याची मागणी लावून धरली. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या चांगलीच शाब्दीक चकमक उडाली. काँग्रेसचे बांधकाम सभापती महावीर ढक्का यांनी आक्रमक भूमिका घेत अन्य नगरसेवकांनीही विषय मंजूर मंजूर म्हणून राष्ट्रगीत लावण्याची मागणी केली. त्याचवेळी महावीर ढक्का आणि शशिकांत घुगे, विशाल बनकर यांच्यात राष्ट्रगीत लावण्यावरून धक्काबुकी व शिवीगाळ झाल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर ज्येष्ठ सदस्यांच्या मध्यस्तीनंतर सभा पुन्हा सुरू झाली. बांधकाम वर्गीकृत रिंंग रस्त्याचे पालिकेकडे हस्तांतर करण्यास मंजुरी देण्यात आली यावर भास्कर दानवे व शशिकांत घुगे यांनी जोरदार हस्तक्षेप घेतला. पालिकेची आर्थिक स्थिती ठिक नसताना हे रस्ते घेतल्यावर पालिका त्याची देखभाल करू शकेल का यावर दोन्ही नगरसेवकांनी खुलासा मागितला. सभेस नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)