शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

निराधारांची दिवाळी अनुदानाविना

By admin | Updated: November 17, 2015 00:34 IST

औरंगाबाद : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना,

औरंगाबाद : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य वेतन योजनेच्या सुमारे ९९ हजार लाभार्थ्यांना अनुदानाविना दिवाळी साजरी करावी लागली आहे. संवेदनाहीन महसूल प्रशासनामुळे लाभार्थ्यांचे अनुदान बँकेत जमा करण्यास उशीर झाला. दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्याचे अनुदान बँकेत जमा करण्यात आले आहे. कोणत्या तालुक्यात किती अनुदान वाटप झाले, याची कुठलीही इत्थंभूत माहिती प्रशासनाकडे नसल्याचे सोमवारी समोर आली. अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी विभागातील कर्मचाऱ्यांना फैलावर घेऊन जिल्ह्यातील अनुदान वाटपाची तातडीने माहिती घेण्याचे आदेश दिले. नव्याने राबविण्यात आलेल्या दिलासा योजनेचा आढावा न घेतल्यामुळे त्या योजनेचेही वाटोळे झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून या योजनांचा अजून आढावा घेण्यात आलेला नाही. बँकांना अनुदानाची रक्कम देऊन प्रशासन निवांत झाले आहे. ते अनुदान लाभार्थ्यांच्या हाती पडले की नाही, याची कुठलीही तसदी प्रशासनाने घेतली नाही. शासनातर्फे निराधारांना आधार मिळण्यासाठी वरील योजना सुरू करण्यात आल्या. ४०० ते ६०० रुपयांपर्यंत दरमहा अनुदान योजनेतून दिले जाते. अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होते. लाभार्थ्यांना अनुदान वेळेत मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्याने दिवाळीपूर्वी अनुदान वाटप करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. परंतु अधिकाऱ्यांनी व तत्सम यंत्रणेने या प्रकरणात काहीही लक्ष न घातल्यामुळे निराधारांना ऐन सणासुदीत अनुदानापासून वंचित राहावे लागले. संजय गांधी निराधार योजनेचे २४ हजार ५७८ लाभार्थी जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात आॅक्टोबरचे अनुदान औरंगाबाद, फुलंब्री, वैजापूर तालुक्यात वाटप करण्यात आले आहे. उर्वरित तालुक्यात सप्टेंबर आणि आॅगस्टपर्यंतचे अनुदान देण्यात आले आहे. श्रावणबाळ योजनेत ४३ हजार ९०१ लाभार्थी आहेत. याबाबत बँकेकडून आणि प्रशासनाकडून लाभार्थ्यांना कु ठलीही माहिती दिली जात नाही. वृद्धापकाळ योजनेचे २९ हजार ९७२ लाभार्थी आहेत. विधवा अनुदान योजनेतून ५६८ लाभार्थ्यांना आॅक्टोबरपर्यंतचे अनुदान मिळाले आहे. अपंग आणि अर्थसाह्य योजनेतील लाभार्थ्यांची हीच अवस्था आहे. अधिकारी बदलले; योजनांकडे दुर्लक्षतत्कालीन जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी निराधारांसाठी असलेल्या योजनांच्या अनुदान वाटपात सुसूत्रता आणली होती. आॅनलाईन अनुदान देण्याचा प्रयोगही त्यांच्या काळात झाला होता. परंतु मे महिन्यापासून आजवर दोन जिल्हाधिकारी बदलून आले. त्यामुळे प्रशासनात मरगळ आलेली आहे. त्या परिणामातूनच जिल्हाधिकारी कार्यालयाशी संलग्न असलेल्या योजनांची गती मंदावली आहे. अप्पर जिल्हाधिकारी सोरमारे म्हणाले, अनुदान तातडीने वाटप करण्यासाठी प्रशासनाला आदेशित करण्यात येईल.