शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई नगरपरीषदेच्या उपनगराध्यक्षपदी राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 19:46 IST

अंबाजोगाई नगरपरीषदेच्या या पंचवार्षिक निवडणुकीतील हे शेवटचे वर्ष आहे. या शेवटच्या वर्षी काँग्रेस पक्षाचा उपनगराध्यक्ष होईल हे पूर्वीच ठरलेले होते.

अंबाजोगाई - अंबाजोगाई नगरपरीषदेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे विद्यमान गटनेते राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड झाली. शुक्रवारी ही निवड प्रक्रिया पार पडली. सध्या राजकिशोर मोदी हे बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी मोदी यांनी अंबाजोगाई नगरपरिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद भूषविले आहे. 

अंबाजोगाई नगरपरीषदेच्या या पंचवार्षिक निवडणुकीतील हे शेवटचे वर्ष आहे. या शेवटच्या वर्षी काँग्रेस पक्षाचा उपनगराध्यक्ष होईल हे पूर्वीच ठरलेले होते. त्यामुळे यावर्षी काँग्रेसचे गटनेते राजकिशोर मोदी यांची निवड उपनगराध्यक्ष म्हणून होणार हे निश्चित झाले होते. अंबाजोगाई नगरपरीषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि. 5 ) नगरपरीषद सभागृहात सर्व सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या वतीने दोन फॉर्म दाखल करण्यात आले होते. बैठकीत २३ नगरसेवकांनी राजकिशोर मोदी यांची उपनगराध्यक्ष निवडीसाठी पाठींबा दिला. त्यातील नगरसेवक मनोज लखेरा यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने काँग्रेस पक्षाचे विद्यमान गटनेते राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. यानंतर कार्यकर्त्यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर आतिषबाजी करत पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला. बैठकीस मुख्याधिकारी अशोक साबळे, नगराध्यक्षा रचना सुरेश मोदी, सभाग्रह अधिक्षक ए.जे.चव्हाण यांची उपस्थिती होती. 

मागील 25 वर्षांपासून नगरपरिषदेत प्रतिनिधित्व सध्या राजकिशोर मोदी हे बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी मोदी यांनी अंबाजोगाई नगरपरिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद भूषविले आहे. अंबाजोगाई शहरातील सर्व आठरापगड जाती धर्मातील समाज बांधवांना सोबत घेऊन मोदी हे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. एक मितभाषी व अभ्यासू राजकीय,नेतृत्व म्हणून मोदींकडे पाहीले जाते. मागील 25 वर्षांपासून अंबाजोगाईकर जनतेने नगरपरिषद निवडणूकीत वेळोवेळी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलेला आहे. त्यामुळेच सर्वसामान्य अंबाजोगाईकर जनतेच्या विश्वासाला पात्र राहून शहराच्या सर्वांगीण विकासाकरीता सर्वांना सोबत घेऊन राजकिशोर मोदी हे कार्यरत आहेत. मोदी यांच्या निवडीचे अंबाजोगाईकर जनतेतून स्वागत होत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBeedबीड