शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना दारू पिने पडले महागात; २२ मद्यपी, ३ ढाबा मालकांना ठोठावला ८८ हजारांचा दंड

By राम शिनगारे | Updated: September 24, 2022 16:05 IST

ढाबा मालक विनापरवाना ग्राहकांना मद्यसेवनासाठी जागा उपलब्ध करुन देत असल्यामुळे गुन्हा दाखल

औरंगाबाद : राज्य उत्पादन शुल्क विभागाने ढाब्यावर अवैधरित्या दारु पिणाऱ्या २२ मदयपींसह ३ ढाबा मालकांवर छापा मारला. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवित औरंगाबाद, फुलंब्री येथील न्यायालयात हजर केले असता, त्यांना तब्बल ८८ हजारांचा दंड ठोठावला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक विजय राेकडे यांच्या पथकाने जालना रोडवरील हॉटेल ग्रीन चिल्ली येथे छापा मारीत अवैध दारु पिणाऱ्यांना पकडले होते. या छाप्यात अवैधरित्या दारु पिणारे १८ ग्राहक आणि ढाबा मालक रवी रघुनाथ नवपुते यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला होता. ही कारवाई २१ सप्टेंबरच्या रात्री केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संबंधित आरोपींच्या विरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, ढाबा मालक रवी नवपुते यास २५ हजार रुपये आणि मद्यसेवन करणाऱ्या १८ ग्राहकांनी प्रत्येकी ५०० रुपये असा एकुण ३४ हजार रुपयांचा दंड ठोठावला. छापा मारण्यापासून दोषारोपत्र दाखल करुन आरोपींना शिक्षा होईपर्यंत सर्व प्रक्रिया १६ तासात पार पडल्याची माहिती निरीक्षक रोकडे यांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या क विभागाचे निरीक्षक नारायण डहाणे यांच्या पथकाने सावंगी बायपास रोडवरील हॉटेल शिवकन्या श्रावणी येथे २१ सप्टेंबरच्या रात्री छापा मारला. तेव्हा त्याठिकाणी ढाबा मालक दत्ता सोनवणे, शुभम बळी यांच्यासह चार मद्यपिंना पकडण्यात आले होते. ढाबा मालक विनापरवाना ग्राहकांना मद्यसेवनासाठी जागा उपलब्ध करुन देत असल्यामुळे सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. 

या आरोपींच्या विरोधात फुलंब्री प्रथमवर्ग न्यायालयात २३ सप्टेंबर रोजी दोषारोपपत्र सादर केले. तसेच न्यायालयात आरोपींनाही हजर करण्यात आले. यात ढाबा मालक दत्ता सोनवणे, शुभम बळी यांना प्रत्येकी २५ हजार आणि चार मद्यपींना प्रत्येकी १ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. ही कामगिरी अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक विजय रोकडे, नारायण डहाके, आर.के.गुरव, जी.बी. इंगळे,बी.आर. वाघमोडे, सहाय्यम दुय्यम निरीक्षक ए.जी.शेंदरकर,प्रविण पुरी, जवान अमित नवगिरे, अमोल अन्नदाते, किशोर सुंदर्डे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद