शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाला आणखी दोन ‘इन्क्युबेशन’ केंद्र मिळणार;केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 11:37 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्रीय उच्चतर अभियान (रुसा) आणि राज्य उद्योग मंत्रालयातर्फे प्रत्येकी एक ‘अटल इन्क्युबेशन’ केंद्र मिळणार आहे

ठळक मुद्देविद्यापीठात बजाज कंपनीच्या सीएसआर निधीतून एक इन्क्युबेशन केंद्र उभारण्यात आले आहे. या इन्क्युबेशन केंद्रातून उद्योगांना लागणारे संशोधन आणि मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी मदत होणार आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्रीय उच्चतर अभियान (रुसा) आणि राज्य उद्योग मंत्रालयातर्फे प्रत्येकी एक ‘अटल इन्क्युबेशन’ केंद्र मिळणार असून, यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठात बजाज कंपनीच्या सीएसआर निधीतून एक इन्क्युबेशन केंद्र उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटनही नुकतेच झाले असून, त्यातून कामकाजाला सुरुवातही झाली. या इन्क्युबेशन केंद्रातून उद्योगांना लागणारे संशोधन आणि मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी मदत होणार आहे. याचवेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठांमधून उद्योजक निर्माण होण्यासाठी रुसाअंतर्गत ‘अटल इन्क्युबेशन’ निर्माण करण्याची योजना सुरू केली आहे. हे इन्क्युबेशन केंद्र तब्बल १० कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणार आहे. 

यासाठी विद्यापीठाने तयार केलेला प्रस्ताव रुसा केंद्राने मान्य केला आहे. यामुळे येत्या काही दिवसांतच या केंद्राच्या उभारणीला सुरुवात होईल. तसेच राज्याच्या उद्योग मंत्रालयानेही उद्योगधंदे असलेल्या ठिकाणच्या विद्यापीठांमध्ये नवउद्योजकांची निर्मिती व्हावी, उद्योगांना लागणारे संशोधन आणि मनुष्यबळ अल्पदरात उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठांना इन्क्युबेशन केंद्र देण्याचा निर्णय घेतला आहे. हे केंद्र ८ कोटी रुपयांच्या निधीतून उभारले जाणार आहे. यासाठीचा प्रस्तावही दाखल करण्यात आला आहे. मुंबई, पुण्यानंतर औरंगाबादेत मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा प्रस्ताव राज्य स्वीकारणार असल्याचे  प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. 

मराठवाड्याला फायदा होईल विद्यापीठात एक इन्क्युबेशन केंद्र सुरू केले आहे. आता त्यात आणखी दोनची भर पडणार आहे. यातून मराठवाड्यासारखा अविकसित भागात उद्योजक निर्माण होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होईल. यासाठी विद्यापीठ सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.-डॉ. बी.ए. चोपडे, कुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजनाCentral Governmentकेंद्र सरकार