औरंगाबाद : १६ फेब्रुवारीपासून भोपाळ येथे होणाºया अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ बुधवारी रवाना झाला. संघाचे कर्णधारपद अक्षय नरवडे भूषवणार आहे. संघासोबत औरंगाबाद जिल्ह्याचे सिनिअर क्रिकेटपटू अॅड. संजय डोंगरे प्रशिक्षक म्हणून गेले आहेत.रवाना झालेला विद्यापीठाचा संघ : अक्षय नरवडे (कर्णधार), ऋषिकेश सोनवणे, चैतन्य पाटील, सूरज सुलाने, हसीब शेख, आदर्श बागवाले, आकाश जगताप, क्षितिज पाटील, अक्षय इंगळे, नचिकेत मुळीक, शौर्य चक्रे, माजीद खान, अविनाश गरड, अक्षय बाविस्कर, मनोज कदम, अजय कावळे. प्रशिक्षक : संजय डोंगरे. या संघाला विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे, सुरेंद्र मोदी, मसूद हाश्मी, नितीन ---------निरवणे, किरण शूरकांबळे, अभिजितसिंह दिख्खत, मनोज शेटे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी विद्यापीठाचा संघ रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:02 IST