शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

विद्यापीठाचा कबड्डी संघ चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:34 IST

दापोली येथे सुरू असलेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मुलांचा कबड्डी संघ चॅम्पियन ठरला.

ठळक मुद्देप्रमोद काळेचे वैयक्तिक दुसरे रौप्य : बास्केटबॉल संघानेही जिंकले कास्य

प्रमोद काळेचे वैयक्तिक दुसरे रौप्य : बास्केटबॉल संघानेही जिंकले कास्यऔरंगाबाद : दापोली येथे सुरू असलेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मुलांचा कबड्डी संघ चॅम्पियन ठरला. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कबड्डीपटू मयुरेश शिवथरकर या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मानकरीही ठरला.त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघानेदेखील भरीव कामगिरी करताना कास्यपदक जिंकले, तर अ‍ॅथलेटिक्समध्येदेखील खेळाडू जबरदस्त कामगिरी करीत असून, काल रौप्यपदक जिंकणाºया प्रमोद काळे याने आजदेखील त्याचे दुसरे पदक जिंकले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कबड्डी संघातील खेळाडूंनी चौफेर खेळ करताना तुल्यबळ मुंबई विद्यापीठाचा ३८ विरुद्ध १६ असा २० गुणांनी धुव्वा उडवताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मयुरेश शिवथरकर याने जबरदस्त चढाया करताना विजयात योगदान दिले. त्याला भूषण कुंभार आणि सुनील दुबिले यांची तोडीची साथ लाभली. सुवर्णपदक जिंकणाºया कबड्डी संघात गणेश जाधव, सुनील दुबिले, तुषार भोईर, मयुरेश शिवथरकर, भूषण कुंभार, ज्ञानेश्वर गुंजाळ, शैलेश डांगे, कुलदीप जाधव, संदीप जाधव व विजय अनपट यांचा समावेश होता. या संघाला प्रशिक्षक डॉ. माणिक राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.अ‍ॅथलेटिक्समध्येही काल गोळाफेकमध्ये रौप्यपदक जिंकणाºया प्रमोद काळे याने आजही जबरदस्त कामगिरीत सातत्य राखताना ४३.४५ मीटर थाळीफेक करताना वैयक्तिक दुसरे रौप्यपदक जिंकले. याआधी अ‍ॅथलेटिक्समध्ये अनिल गुंघासे याने ६४ मीटर १० सेंटिमीटर भालाफेक करताना सुवर्णपदक जिंकले होते, तर स्नेहल हार्दे हिने उंच उडीत रौप्यपदक पटकावले होते. या खेळाडूंना सुरेंद्र मोदी आणि नितीन निरावने यांचे मार्गदर्शन लाभले आहे.आज बास्केटबॉलमध्ये औरंगाबादने नांदेडच्या एसआरटी विद्यापीठावर ६३-४७ अशी मात करीत कास्यपदक जिंकले. राष्ट्रीय खेळाडू शुभम पांडे आणि अक्षय खरात यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. या संघाला जमीर सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. पदकविजेत्या खेळाडूंचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे यांनी अभिनंदन केले आहे.

विद्यापीठाचा कबड्डी संघ चॅम्पियनप्रमोद काळेचे वैयक्तिक दुसरे रौप्य : बास्केटबॉल संघानेही जिंकले कास्यऔरंगाबाद : दापोली येथे सुरू असलेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मुलांचा कबड्डी संघ चॅम्पियन ठरला. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कबड्डीपटू मयुरेश शिवथरकर या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मानकरीही ठरला.त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघानेदेखील भरीव कामगिरी करताना कास्यपदक जिंकले, तर अ‍ॅथलेटिक्समध्येदेखील खेळाडू जबरदस्त कामगिरी करीत असून, काल रौप्यपदक जिंकणाºया प्रमोद काळे याने आजदेखील त्याचे दुसरे पदक जिंकले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कबड्डी संघातील खेळाडूंनी चौफेर खेळ करताना तुल्यबळ मुंबई विद्यापीठाचा ३८ विरुद्ध १६ असा २० गुणांनी धुव्वा उडवताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मयुरेश शिवथरकर याने जबरदस्त चढाया करताना विजयात योगदान दिले. त्याला भूषण कुंभार आणि सुनील दुबिले यांची तोडीची साथ लाभली. सुवर्णपदक जिंकणाºया कबड्डी संघात गणेश जाधव, सुनील दुबिले, तुषार भोईर, मयुरेश शिवथरकर, भूषण कुंभार, ज्ञानेश्वर गुंजाळ, शैलेश डांगे, कुलदीप जाधव, संदीप जाधव व विजय अनपट यांचा समावेश होता. या संघाला प्रशिक्षक डॉ. माणिक राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.अ‍ॅथलेटिक्समध्येही काल गोळाफेकमध्ये रौप्यपदक जिंकणाºया प्रमोद काळे याने आजही जबरदस्त कामगिरीत सातत्य राखताना ४३.४५ मीटर थाळीफेक करताना वैयक्तिक दुसरे रौप्यपदक जिंकले. याआधी अ‍ॅथलेटिक्समध्ये अनिल गुंघासे याने ६४ मीटर १० सेंटिमीटर भालाफेक करताना सुवर्णपदक जिंकले होते, तर स्नेहल हार्दे हिने उंच उडीत रौप्यपदक पटकावले होते. या खेळाडूंना सुरेंद्र मोदी आणि नितीन निरावने यांचे मार्गदर्शन लाभले आहे.आज बास्केटबॉलमध्ये औरंगाबादने नांदेडच्या एसआरटी विद्यापीठावर ६३-४७ अशी मात करीत कास्यपदक जिंकले. राष्ट्रीय खेळाडू शुभम पांडे आणि अक्षय खरात यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. या संघाला जमीर सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. पदकविजेत्या खेळाडूंचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे यांनी अभिनंदन केले आहे.