शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती देण्यात विद्यापीठ अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2016 00:52 IST

औरंगाबाद : सर्वाधिक संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणारी संस्था अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ओळख निर्माण झाली आहे.

औरंगाबाद : सर्वाधिक संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणारी संस्था अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ओळख निर्माण झाली आहे. अनुसूचित जाती- जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्याक, सर्वसाधारण गुणवत्ताधारक, शेतकरी कुटुंबातील पाचशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ होत आहे. विद्यापीठात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकांमधील विद्यार्थी आहेत. आर्थिक पाठबळाअभावी उच्च शिक्षणामध्ये अनेक विद्यार्थी संशोधन करू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. अनुसूचित जाती- जमातीमधील पीएच. डी. आणि एम. फिल. करणाऱ्या विद्यार्थ्यांना राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती केंद्र सरकारकडून दिली जाते. त्याचप्रमाणे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यापीठाच्या विविध विभागांतील ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळत असल्याची माहिती मिळाली. यामध्ये विज्ञान, सामाजिक शास्त्रे व व्यावसायिक अभ्यासक्रम, अशा सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी आहेत. २५ हजार रुपये ते २८ हजार रुपये, अशी ही शिष्यवृत्ती मिळते. याशिवाय पोस्ट डॉक्टरल फेलोशिप, केंद्र सरकारचा विज्ञान तंत्रज्ञान विभाग, बार्टी आदी संस्थांकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत आहे.