शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीत अनोखा विवाह; रात्री १२ वाजता २० फूट खोल बारवेत लागणार शिव-पार्वतीचे लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2022 19:53 IST

जुन्या भावसिंगपुऱ्यात प्राचीन श्री सत्येश्वर शिव-पार्वती मंदिर आहे. हे मंदिर चक्क बारवेत आहे.

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : सगळ्यांपेक्षा आपले लग्न जरा हटके असावे, अशी काही नवरदेव व नवरीची इच्छा असते. यामुळे कोणी विमानात लग्न लावतात तर कोणी चोहीबाजूने अथांग समुद्रात आलिशान क्रूझवर लग्न लावतात. मात्र भावसिंगपुऱ्यात महाशिवरात्रीला मध्यरात्री १२ वाजेच्या मुहूर्तावर चक्क जमिनीपासून २० फूट खोल बारवेत एक अनोखा लग्नसोहळा पार पडणार आहे.

‘बारवेत लग्न’; तेही रात्री १२ वाजता; हे वाचून आपणास नवल वाटले असेल. पण अहो, हा लग्न सोहळा कोणा पुरोगामी, सुधारणावादी किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांचा नाही. तर साक्षात देवांचे देव महादेव व पार्वती यांचा आहे. जुन्या भावसिंगपुऱ्यात प्राचीन श्री सत्येश्वर शिव-पार्वती मंदिर आहे. हे मंदिर चक्क बारवेत आहे. ३४ पायऱ्या उतरून गेल्यावर बारवेत पाणी लागते. त्याआधी १८ व्या पायरीवर भगवान शंकर व देवी पार्वती यांचे समोरासमोर मंदिर आहे. महाशिवरात्रीला मध्यरात्री १२ वाजता येथे शिव-पार्वतीचे लग्न लावण्यात येणार आहे.

वऱ्हाडी मंडळी म्हणजे परिसरातील रहिवासी असणार आहेत. भाविक हातात अक्षता घेऊन उभे असतील. देवी पार्वतीला अलंकाराने सजविण्यात येईल. महादेवाला मुंडावळ्या बांधण्यात येतील. अंतरपाट धरण्यात येईल. मंगलाष्टक म्हणण्यात येईल. शहनाई-चौघडा वाजविला जाईल. फटाक्यांची आतषबाजी होईल. चोहीबाजूने अंधार व बारवेत लख्ख प्रकाशात हा लग्न सोहळा डोळे दीपवून टाकणार ठरेल. यासाठी बारवेला व मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली आहे. आदल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजता गावकऱ्यांनी अभिषेक करून महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात केली.

देशात तीन ठिकाणी मंदिरदेशात औरंगाबादसह उज्जैन, त्र्यंबकेश्वर या तीन ठिकाणी शिव-पार्वतीचे समोरासमोर मंदिर आहे. त्यातील जुना भावसिंगपुरा येथील मंदिर एकमेव आहे, जे बारवेत आहे. हे मंदिर सुमारे ३५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. शहरापासून दूर निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे. निजामाच्या सैन्यातील भावसिंग नावाच्या सरदाराने भावसिंगपुरा गाव वसविले. या परिसरात सैनिकांची छावणी उभारली. शिवभक्तांसाठी येथील बारवेत हे मंदिर बांधले, अशी माहिती पुजारी सदाशिव खेळतोंड (वाणी) यांनी दिली.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीAurangabadऔरंगाबाद