शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पत्रप्रपंचातून जिल्हा परिषद अंतर्गत राबविणार जनजागृतीचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2016 00:30 IST

संजय तिपाले , बीड ‘सप्रेम नमस्कार, विनंती विशेष...’ हे पोस्टकार्डवरील शब्द आधुनिक तंत्रज्ञानात दुर्मिळ होत असताना जिल्हा परिषदेने मात्र पाणंदमुक्तीची मोहीम

संजय तिपाले , बीड‘सप्रेम नमस्कार, विनंती विशेष...’ हे पोस्टकार्डवरील शब्द आधुनिक तंत्रज्ञानात दुर्मिळ होत असताना जिल्हा परिषदेने मात्र पाणंदमुक्तीची मोहीम गतिमान करण्यासाठी पत्राची मात्रा वापरली आहे. विद्यार्थी व नातेवाईकांमार्फत पत्र पाठवून शौचालय बांधण्याची भावनिक विनंती केली जात आहे. अवघ्या ५० हजार रुपयांत एक लाख कुटुंबियांपर्यंत पोहोचण्याचा हा पत्रप्रपंच मोहिमेसाठी फलदायी ठरत आहे. जि.प. सीईओ नामदेव ननावरे यांच्या संकल्पनेतून ‘नातं जबाबदारीचं’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे. त्यांतर्गत १५ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत २५ हजार कुटुंबियांना शौचालय बांधून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना शौचालय बांधून द्यायचे आहे. सीईओंनी त्यासाठी पावतीपुस्तके छापली असून भेटावयास येणाऱ्या प्रत्येकाला ते शौचालय बांधण्यास प्रवृत्त करतात. आमूक नातेवाईकांना मी शौचालय बांधून देत असल्याचे या पावतीपुस्तकात कर्मचाऱ्यांनी नोंद करावयाची आहे. दरम्यान, जि.प. मार्फत कर्मचाऱ्यांनी ज्या नातेवाईकाला शौचालय बांधून देण्याचे आश्वासन दिले, त्याचे काय झाले? हे जाणून घेण्यासाठी पत्रव्यवहार केला जाणार आहे.यालाच जोडून आता दुसरा उपक्रम आहे तो पत्राचा! विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, आरोग्यसेवक यांच्यामार्फत नातेवाईक, मित्र व त्यांच्या पाहणीत असलेल्या कुटुंबियांना पत्राद्वारे शौचालय बांधण्याची गळ घातली जाणार आहे. याशिवाय सीईओंसह सर्व विभागप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांना कामानिमित्त भेटावयास येणाऱ्या नागरिकांच्या हातात कोरे पत्र ठेवून त्यांच्यामार्फत शौचालय बांधून घेण्याची विनंती इतरांना केली जाणार आहे. त्याची स्वतंत्र नोंद ठेवून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येणार आहे. या अनोख्या उपक्रमातून ५० हजार रुपयांत १ लाख कुटुंबांना पाणंदमुक्तीचा संदेश दिला जाणार आहे. ही मोहीम फलदायी ठरावी यासाठी अधिकारी, कर्मचारी जोमाने कामाला लागले आहेत.