शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ऊस लागवडीसाठी अनोखे जुगाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:02 IST

शेतीला लागणारा वाढता खर्च आणि मजुरांच्या टंचाईमुळे वैतागलेल्या अगरवाडगाव येथील पठाण बंधंूनी ऊस लागवडीसाठी अनोखे जुगाड जमविले. परिसरात पठाण बंधूंनी केलेल्या ऊस लागवडीच्या नवीन उपायाने शेतकºयांना नवीन तंत्र माहिती झाले आहे. येत्या काळात या बंधूंनी वापरलेले जुगाड इतरही शेतकरी वापरतील, अशी शक्यता आहे.

तारेख शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककायगाव : शेतीला लागणारा वाढता खर्च आणि मजुरांच्या टंचाईमुळे वैतागलेल्या अगरवाडगाव येथील पठाण बंधंूनी ऊस लागवडीसाठी अनोखे जुगाड जमविले. परिसरात पठाण बंधूंनी केलेल्या ऊस लागवडीच्या नवीन उपायाने शेतकºयांना नवीन तंत्र माहिती झाले आहे. येत्या काळात या बंधूंनी वापरलेले जुगाड इतरही शेतकरी वापरतील, अशी शक्यता आहे.गंगापूर तालुक्यातील अगरवाडगाव येथील उस्मान पठाण यांच्या कुटुंबातील सुभान, अस्लम, आजम आणि अक्रम ही भावंडे शेती व्यवसाय करतात. दरवर्षी पारंपरिक पद्धतीने शेती करून वर्षाच्या शेवटी हाती फारसे काही शिल्लक राहत नसल्याने पठाण कुटुंबिय त्रस्त झाले होते. त्यामुळे यावर्षी शेती करताना काहीतरी नवीन करून शेती परवडेल यासाठी उपाययोजना करण्याचे सर्वांनी ठरविले.उसाच्या लागवडीसाठी एकरी तीन ते चार हजारांचा खर्च आणि मजुरांची टंचाई यावर काय मार्ग काढता येईल, याबाबत सगळेजण विचार करू लागले. पारंपारिक पद्धतीने उसाची लागवड करताना मजुरांच्या हाताने ऊस तोडणे, सरीत ऊस नेऊन टाकणे आणि लागवडीसाठी बेणे पसरविणे आदी कामे मजुरांच्या हाताने करावी लागतात.मात्र पठाण बंधंूनी यासाठी ट्रॅक्टरच्या साह्याने लागवड करण्याचे जुगाड जमविले. सर्वप्रथम उसाचे बेणे तोडून एका ठिकाणी जमा केले. नंतर त्याचे लागवडीयोग्य तुकडे करून ट्रॅक्टरच्या मागील बाजूस ठेवले. एकाने लागवड करायची आहे . त्या सरीत ट्रॅक्टर चालवायचा, दोघांनी ट्रॅक्टरच्या मागील रेजरवर बसून सरीत एक-एक करून उसाचे टिपरु मातीत लावत चालायचे आणि एकाने उसाचे टिपरू ट्रॅक्टरपर्यंत आणून द्यायचे. या पद्धतीने उसाची लागवड केली.पाच मजुरांना किमान आठ दिवस जाणारी लागवड या नवीन तंत्राने अवघ्या दोन दिवसांत उरकली. ट्रॅक्टर आणि लागवड करणारे घरचेच असल्याने खर्चाचाही विषय आला नाही. याच ऊस लागवडीसाठी मजुरांना किमान पंधरा ते वीस हजार रुपये खर्च आला असता. हा सर्व खर्च आणि वेळ यामुळे वाचला.पठाण बंधूंनी लागवडीसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती परिसरात पोहोचताच अनेकांनी लागवड सुरू असलेल्या शेताला भेट दिली. एवढ्या सोप्या आणि सुटसुटीत असणाºया तंत्राने लागवड करणे आपल्यालाही जमेल, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.शेतकºयांनी शेती करताना पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची जोड दिली तर शेती करणे सोपे आणि सुटसुटीत होते, असे पठाण कुटुंबिय सांगतात. लागवडीसाठी लागणारा खर्च वाचला, आता तोच पैसा खतासाठी वापरता येईल. त्यामुळे उसाच्या उत्पादनात वाढ करणे शक्य होईल. येत्या काळात शेतीत आणखी काय नवीन करता येईल, यासाठी सगळेजण प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.