शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना घाटी रुग्णालय देणार युनिक आयडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 20:11 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (घाटी) दिव्यांगांना (अपंग) युनिक आयडी देण्यासाठी पुढाकार घेतल्याने जिल्ह्यातील दिव्यांगांना ‘युनिक आयडेंटिफिकेशन’ मिळण्याचा तिढा अखेर सुटला आहे. 

ठळक मुद्देराज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांना युनिक आयडी या ओळखपत्राचे वितरण केले जात आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील दिव्यांगांना मात्र घाटी रुग्णालय प्रशासन आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या चालढकलपणाने गेल्या वर्षभरापासून युनिक आयडीची  प्रतीक्षा करावी लागत आहे.

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (घाटी) दिव्यांगांना (अपंग) युनिक आयडी देण्यासाठी पुढाकार घेतल्याने जिल्ह्यातील दिव्यांगांना ‘युनिक आयडेंटिफिकेशन’ मिळण्याचा तिढा अखेर सुटला आहे. 

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांना युनिक आयडी या ओळखपत्राचे वितरण केले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दिव्यांगांना मात्र घाटी रुग्णालय प्रशासन आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या चालढकलपणाने गेल्या वर्षभरापासून युनिक आयडीची  प्रतीक्षा करावी लागत आहे. या दोन्ही विभागांचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवीत गेले. त्यामुळे नाहक मनस्ताप सहन करण्याची आणि विविध सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ जिल्ह्यातील दिव्यांगांवर आली. ही परिस्थिती ‘लोकमत’ने ७ जुलै २०१७ रोजी ‘युनिक आयडीसाठी टोलवाटोलवी’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणली. त्यानंतरही सातत्याने ‘युनिक आयडी’साठी पाठपुरावा करण्यात आला. अखेर घाटी प्रशासनाला युनिक आयडी वितरणाची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार घाटी प्रशासनाने त्याची तयारी सुरू केली. 

‘युनिक आयडी’चा उद्देशयुनिक आयडीच्या माध्यमातून देशभरातील दिव्यांगांची संख्या, अपंगत्वाची टक्केवारी, याची इत्थंभूत माहिती एकत्रित केली जात आहे. या ओळखपत्राद्वारे दिव्यांगांसाठी असलेल्या सुविधा देशात कोठेही घेता येतात. खर्‍या लाभार्थ्यांनाच याचा अधिकाधिक फायदा होण्याचा उद्देश यातून साध्य केला जात आहे. अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक करणार्‍यांवरही यातून अंकुश बसण्यास मदत होते.

घरपोच आयडीघाटी रुग्णालयाकडून अपंग प्रमाणपत्र दिले जात आहे. त्यामुळे  युनिक आयडीदेखील घाटी प्रशासनाकडून देण्यात येईल. संगणकीय प्रणालीवर नोंद झाल्यानंतर दिव्यांगांना घरपोच युनिक आयडी मिळेल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे म्हणाले.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी