औरंगाबाद - ज्यांच्याकडे रेडा आहे अशा लोकांमध्ये रेड्यांचा श्रृंगारावरून होड निर्माण होते. रेड्यांना सजनणं व आभुषणे घालून तयार करणे, नाकात नवीन दोरी, पायात चांदीचा कडा, गळ्यात माळ, शिंगांवर रंग तसेच मोरपंख, तसेच वाद्य वाजवणा-यांना पाचारण करून वाजत गाजत परंपरेनुसार प्रत्येक घरात आपापल्या रेड्यांची नटवून थटवून घरातील सर्व सदस्य एकत्र येऊन पूजा करतात. आरती ओवाळतात व त्याला पूर्ण मानपान देण्याचा प्रयत्न करतात. असे मानतात की तो घरातील सदस्यांपैकी एक आहे. याची जाणीव त्याला करून देतात. रेड्याची ओवाळणी करून पूजा करताना एका घरातील हे दृष्य.
नवबापूर गवळी येथे गवळी समाज बांधवांनी सुरू केलेल्या या उत्सवाला सुमारे दीडशे वर्ष पूर्ण होत आले आहे. कोणतेही गालबोट न लागता गुण्यागोविंदाने या भागात अनेक वर्षांपासून सगर रेड्यांचा मेळावा सर्व समाजाचे लोक मिळून वाजत गाजत तसेच आपापल्या रेड्यांची मिरवणूक काढत मुख्य मिरवणुकीत सहभागी होतात. म्हणजे एक प्रकारे फॅशन शो आयोजित केला जातो, असे म्हटले जाते.मालकाला एक नवीन ओळख मिळवून देण्यासाठी ग्रामीण तसेच शहराच्या विविध भागातून आनलेल्या रेड्यांना मालक कोणतीच कसर सोडत नाहीत त्याला नटवून, त्यांचे पिळदार शरीर कसे निरखून दिसेल याची पूर्ण काळजी घेतो. चित्रपटातील बहुचर्चित व तसेच चित्रपटांची नावे बाहुबली, दबंग, सिंघम, बलवान, सुलतान अशी नावं रेड्यांना दिली जातात. एकतेचे दर्शन या मिरवणुकीत सहभागी होणारे रेड्यांचे मालक हे सर्व समाजाचे लोक असतात गुण्यागोविंदाने व मोठ्या उत्साहाने हा उत्सव पार पाडतात. जातीय सलोखा राखत तसेच फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात सर्व समाजातील लोक हा सण साजरा करतात.